मास्कमधून साडेपाच कोटींची उलाढाल, बचतगटांनी केले आपत्तीचे संधीत रूपांतर

Self Help Group Latur, Latur News
Self Help Group Latur, Latur News
Updated on

लातूर ः कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला; पण इच्छाशक्ती असेल तर आपत्तीचे संधीत रूपांतर करून त्याचे सोनं करता येते, हे राज्यातील बचत गटांच्या महिलांनी दाखवून दिले. सहा हजार सातशे बचत गटांच्या महिलांनी लॉकडाउनच्या काळात ५१ लाख ३३ हजार मास्क तयार करण्याचा विक्रम केला आहे. साडेचोवीस हजार महिलांच्या हाताला घरबसल्या रोजगार मिळालाच; पण साडेपाच कोटींची उलाढालही झाली आहे.


कोरोनाची संसर्ग होऊ नये म्हणून मास्कची मागणी वाढली. बचत गटांच्या महिलांनी मास्कनिर्मितीचे शिवधनुष्य उचलले. पहिल्या २१ दिवसांच्या लॉकडाउनच्या काळात सुमारे तीन हजार बचत गटांच्या महिलांनी मास्क तयार करण्यास सुरवात केली होती. दुसरा लॉकडाउनच्या काळात ही संख्या वाढली आणि सहा हजार ७२१ बचत गट कामाला लागले.


चोवीस हजार महिलांना रोजगार
राज्यातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली बचत गटांनी या कार्यात पुढाकार घेतला. पहिल्या लॉकडाउनच्या काळात राज्यातील दहा हजार ६६० महिलांना रोजगार उपलब्ध झाला. एकमेकांचे काम पाहून ही संख्या वाढत गेली. दुसऱ्या लॉकडाउनच्या काळात ही संख्या २४ हजार ३९५ वर गेली.
राज्यातील या महिलांनी दोन लॉकडाउनच्या काळात ५१ लाख ३३ हजार ९८४ मास्क तयार केले. आतापर्यंत ४८ लाख ५२ हजार ७९५ मास्कची विक्री केली. त्यातून पाच कोटी ६७ लाख ६६ हजार ९५४ रुपयांची उलाढाल केली. बहुतांश मास्क ग्रामपंचायतींनाच विकले गेले. एखाद्या संकटाचे रूपांतर संधीत करून इतक्या मोठ्या प्रमाणात उलाढाल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

नागरिकांकडून जबाबदारीचे भान हरपले, शिथिलता मिळताच बाजारपेठेत गर्दी

विभाग---बचत गट संख्या---रोजगार मिळालेल्या महिला -- मास्कनिर्मिती-------मास्क विक्री----उलाढाल
अमरावती--३,०२७---------७,५०४------------------------९,४९,७७३-----------८,६७,९६४---५५,३१,१६५
औरंगाबाद--८८२----------३,७७३----------------------१०,५०,९८९----------९,७३,३४३----१,१५,९०,२२८
कोकण----६५४-----------३,८४३----------------------९,३३,४२१----------९,००,२५१------१,३३,८०,६८०
नागपूर---८४२----------२,९७०------------------------५,४६,९२६----------४,८५,१३३------८४,१२,८१९
नाशिक----५३९---------२,३३८--------------------६,५८,४५०------------६,४७,३७३--------७०,३९,८२२
पुणे----७७७-----------३,९६७-------------------६,९४,४२५--------------९,७८,७३१--------१,०८,१२,२४०
----------------------------------------------------------------------------------------------------------
एकूण--६,७२१-------२४,३९५------------------५१,३३,९८४--------------४८,५२,७९५--------५,६७,६६,९५४
----------------------------------------------------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com