नोकरीचे आमिष दाखवून भावी शिक्षिकेवर सामूहिक अत्याचार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

औरंगाबाद - नोकरीचे आमिष दाखवून संस्थाचालकासह शिक्षक व कर्मचाऱ्याने चौतीसवर्षीय भावी शिक्षिकेवर सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. 10) बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद झाली. पोलिसांनी संस्थाचालकासह तिघांना बुधवारी (ता. 11) अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश नागोराव जाधव (वय 42, रा. देवळाईरोड, बीड बायपास परिसर) असे संशयित संस्थाचालकाचे नाव आहे. जनता शिक्षण प्रसारक मंडळाचा तो संस्थाचालक आहे. वाळूज व नांदेड येथे त्याच्या संस्था आहेत. संस्थेतील शिक्षक प्रताप आनंदराव पाटील (वय 47, आलोकनगर, सातारा परिसर) व कर्मचारी सुरेश शंकर शिपणे (वय 46, रा. बालाजीनगर) अशी अन्य संशयितांची नावे आहेत. या प्रकरणात पीडित महिलेने तक्रार दिली. संस्थेवर नोकरी देण्याचे आमिष अविनाश जाधव व अन्य दोघांनी डिसेंबर 2012 मध्ये दाखवले. त्यानंतर महिलेकडून दहा लाख रुपये घेतले. जाधवच्या पत्नीशी महिलेची ओळख झाल्याने याचा गैरफायदा संशयितांनी घेतला व तिच्याशी सलगी वाढविली. यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. या अत्याचाराची वाच्यता केल्यास पैसे परत देणार नाही, असे सांगून तिघे तिला ब्लॅकमेल करीत होते. संशयितांनी डिसेंबर 2012 ते दहा मे 2018 दरम्यान संस्थेवर नोकरी न लावता विश्‍वासघात केला. तसेच सामूहिक अत्याचार केल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले. त्यानुसार याप्रकरणी सिडको ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. संशयितांना अटक झाल्याची माहिती तपास अधिकारी सहायक निरीक्षक व्ही. के. झुंजारे यांनी दिली. 

Web Title: Mass tortures on future teachers