

Mass Protest: Thousands Join Candlelight March in Rui Village Over Youth's Murder
Sakal
अशोक चांगले
सुखापुरी : अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरातील रुई येथील राजेश कोरकाने खुन प्रकरण “नराधमांना फाशी द्या... राजेशला न्याय द्या...!” या आक्रोशाने रविवारी संपूर्ण रूई गाव हादरून गेले. युवक राजेश कोरकणे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ गावातील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांनी हजारोंच्या संख्येने एकत्र येत भव्य कँडल मार्च काढला.