महापौरांच्या आदेशांचाच "कचरा'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

औरंगाबाद - दोन महिन्यांनंतरही शहरातील कचराकोंडी कायम असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गुरुवारी (ता. 19) नागरिकांची माफी मागावी लागली. त्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी (ता. 20) बैठक घेऊन दहा दिवसांचा कृती कार्यक्रम आखून दिला; मात्र गेल्या दोन महिन्यांत महापौरांनी दिलेल्या आदेशांचा प्रशासनाने कचरा केला असून, अद्याप एकाही निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे नव्या कृती कार्यक्रमाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण केले जात आहेत.

शहराच्या कचराकोंडीला शुक्रवारी 63 दिवस पूर्ण झाले.

Web Title: mayor order garbage issue