मायभूमीकडे परतलेल्यांची वैद्यकीय तपासणी 

प्रकाश ढमाले
बुधवार, 25 मार्च 2020

कोरोना विषाणूने जगभरात थैमान मांडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे थोडा जरी ताप, खोकला आला तर ग्रामस्थ वैद्यकीय तपासणी करण्यास झुंबड करत आहेत. त्यांची सुरक्षित अंतर ठेवून रांगेत तपासणी केली जात आहे.

पिंपळगाव रेणुकाई (जि.जालना) -  कोरोनोच्या भीतीपोटी कामानिमित्त पुणे, मुंबई यासह विविध राज्यांत गेलेले लोक मायभूमीकडे वळले आहे. मात्र त्यांचा धोका मायभूमीतील लोकांना होऊ नये म्हणून त्यांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. 

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन दिवसांत पाचशे रुग्णांची तपासणी करून संरक्षित असल्याचे शिक्के त्यांच्या हातावर मारण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एम. राऊत यांनी दिली. कोरोना विषाणूने जगभरात थैमान मांडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे थोडा जरी ताप, खोकला आला तर ग्रामस्थ वैद्यकीय तपासणी करण्यास झुंबड करत आहेत. त्यांची सुरक्षित अंतर ठेवून रांगेत तपासणी केली जात आहे.

हेही वाचा : जालन्याच्या इतिहासात प्रथमच स्टील उद्योग बंद

या आठवड्यात आरोग्य केंद्राच्या बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांचा आकडा दुपटीने वाढला आहे. दरम्यान, या कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी संपूर्ण देशालाच लॉकडाऊन केले आहे. मात्र याआधीच काही ग्रामस्थ शहरांमधून गावाकडे आले आहे. त्यांना वैद्यकीय तपासणी करून घेणे बंधनकारक आहे.

हेही वाचा :   जालना जिल्ह्यात ३२ चेकपोस्ट

यामुळे गावातील सरपंच, पोलिसपाटील, ग्रामविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पोलिस आदी शहरातून आलेल्या ग्रामस्थांवर लक्ष ठेवून असून, त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेतल्या जात आहे. यासाठी शहरातून आलेल्यांच्या नावाच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत व त्याचे वाचनही ग्रामपंचायतवर करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medical checkup in Pimpalgaon