प्रलयकारी भूकंपाच्या जाग्या झाल्या आठवणी

किल्लारीः प्रलंयकारी भूकंपात मृत पावलेल्यांना जुन्या गावातील स्मृतिस्तंभस्थळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनीही श्रद्धांजली वाहिली.
किल्लारीः प्रलंयकारी भूकंपात मृत पावलेल्यांना जुन्या गावातील स्मृतिस्तंभस्थळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनीही श्रद्धांजली वाहिली.

किल्लारी(जि. लातूर) : महाप्रलयकारी भूकंपाला 26 वर्षे पूर्ण झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या जुने किल्लारी गावठाणातील स्मृतिस्तंभ येथे त्यातील मृतांना सोमवारी (ता. 30) प्रशासनाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.

 
किल्लारी आणि परिसरातील 52 गावांत ता. 30 सप्टेंबर 1993 रोजी आलेल्या भूकंपात चौदा हजारांवर लोक मृत्युमुखी पडले होते. नऊ हजारांवर अपंग झाले. यात अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. अनेकांच्या घराला वारस राहिला नाही. आजही या दिवसाची आठवण येताच या भागातील लोकांच्या अंगावर शहारे येतात. 


अशा मृतात्म्यांना शांती लाभावी यासाठी जुन्या किल्लारी गावात स्मृतिस्तंभ उभारण्यात आला आहे. दरवर्षी या ठिकाणी शासनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली जाते. यावेळी किल्लारी आणि परिसरातील लोकप्रतिनिधी, नागरिक, शाळांचे विद्यार्थी, प्रशासकीय अधिकारी येथे श्रद्धांजली वाहतात. 


सोमवारी तहसीलदार शोभा पुजारी, नायब तहसीलदार वृषाली केसकर, मंडळाधिकारी आर. एस. हाशमी, तलाठी बी. आर. जाधव, सरपंच शैला लोहार, भाजपचे अरविंद पाटील निलंगेकर, उपसरपंच डॉ. अशोक पोद्दार, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप लोहार, जिल्हा वन परिक्षेत्र अधिकारी सी. जी. पोतलवार, तालुका वन अधिकारी गणेश शेवाळे, वनरक्षक व्ही. व्ही. नारंगवाडे, पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंडे आदींच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी पोलिसांच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून श्रद्धांजली वाहण्यात आली. व्यापाऱ्यांनी दिवसभर बाजारपेठ बंद ठेवून हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला. 


ग्रामस्थ पप्पू बालकुंदे, सतीश भोसले, अशोक गावकरे, बिसरसिंग ठाकूर, गुलाब शिंदे, अभिमन्यू जाधव, सीताराम शिंदे, राहुल शिंदे, समाधान कांबळे, ख्वाजा मुल्ला, अनंत बाबळसुरे, सूरज स्वामी, परमेश्वर बिराजदार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com