esakal | महिलेच्या मृत्यूनंतर अडीच महिण्याने आयसोलेट होण्याचा संदेश
sakal

बोलून बातमी शोधा

मयत चंपाबाई पोघे, हिंगोली

महिलेच्या मृत्यूनंतर अडीच महिण्याने आयसोलेट होण्याचा संदेश

sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : शहरालगत जवळा पळशी रोडवर असलेल्या सीतारामनगरी येथील रहिवासी एका महिलेचा अडीच महिन्यापुर्वी कोविडने मृत्यू झाला. त्याची नोंदही शासकिय रुग्णालयाकडे आहे. मात्र अडीच महिन्यानंतर शनिवारी (ता. १२) दुपारी त्या महिलेच्या कुटुंबियांच्या भ्रमणध्वनीवर संदेश पाठवून महिलेचे रॅपीड चाचणीसाठी नमुने घेतले असून आयसोलेट होण्याचा सल्ला दिला आहे. या प्रकाराने कुटुंबीय आश्चर्य चकित झाले आहे.

हिंगोली शहरातील चंपाबाई मेसाजी पोघे (वय ८०) यांना कोविडचा त्रास होत असल्याने त्यांना मार्च महिन्यात (ता. २४) रोजी जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे सीटीस्कॅन केल्यानंतर त्यात त्यांचा स्कोर १८ पेक्षा अधिक आला होता. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर उपचार सरु करण्यात आले.

हेही वाचा - लोणार तालुक्यातील अंकूश गायकवाड, त्र्यंबक थोरवे रा. पळसखेड, जि. बुलढाणा, विजय ठाकरे, गजानन सानप रा. खळेगांव ता. लोणार, अशी या मृतांची नावे आहेत.

चंपाबाई यांना रुग्णालयात दाखल करतांना त्या ठिकाणी सर्व माहिती देऊन त्यांच्या मुलाचा भ्रमणध्वनी क्रमांक नमुद केला होता. मात्र (ता. ३१) मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे पोघे कुटुंबांवर दुःख कोसळले. दरम्यान, शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मुलाच्या भ्रमणध्वनीवर माय गव्हर्नमेंट अॅपवरुन संदेश पाठविण्यात आला. त्यात चंपाबाई यांचे स्वँब नमुने रॅपीड चाचणीसाठी घेण्यात आले असून हा संदेश जपून ठेवण्याचे कळविले आहे. या प्रकारामुळे कुटुंबीय आश्चर्य चकित झाले आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या या प्रतापामुळ कुटुंबियांची चांगलीच धांदल उडाली होती. रुग्णालयात मृत्यूची नोंद असताना हा संदेश येतोच कसा यावरुन प्रशासनाच्या कामाबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त केल्या जात आहे. या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी मयत चंपाबाई पोघे यांच्या कुटुंबियांनी केली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image