Hingoli Earthquake: जमीन अन् माणसेही हादरली! मध्यरात्री भूकंपाच्या धक्क्यांनी कळमनुरीकर भयभीत; खुल्या जागेत आश्रय घेत रात्र काढली जागून..

Kalamnuri Residents Take Shelter in Open Areas Overnight: मध्यरात्री कळमनुरीत सलग भूकंपाचे धक्के; घाबरलेले नागरिक कुटुंबांसह घराबाहेर, मोकळ्या जागेत रात्रभर जागरण
Earth Tremors Trigger Panic in Kalamnuri; Frightened Families Rush Outdoors

Earth Tremors Trigger Panic in Kalamnuri; Frightened Families Rush Outdoors

sakal

Updated on

संजय शकुंतला गणपतराव कापसे

कळमनुरी : शहरासह परिसरात गुरुवारी (ता. नऊ) पहाटेच्या सुमारास भूकंपाचे सलग धक्के जाणवल्याने नागरिक भयभीत झाले. दोन तासांच्या कालावधीत अनेकवेळा धक्के जाणवल्याने नागरिकांनी घराबाहेर धाव घेत खुल्या जागेत आश्रय घेतला. भीतीपोटी अनेकांनी संपूर्ण रात्र जागून काढली. या धक्क्यांनी काही ठिकाणी बांधकामास तडे गेले. सर्व नागरिक पहाटे झोपेत असताना गुरुवारी (ता. नऊ) पहाटे १.३७ ला भूकंपाचा पहिला मोठा धक्का जाणवला. या धक्याची तीव्रता गाढ झोपेत असलेल्या नागरिकांनाही जाणवली. त्यानंतर काही वेळाच्या अंतराने भूकंपाचे सलग दोन धक्के जाणवल्याने अनेक नागरिकांनी भीतीपोटी कुटुंबासह घराबाहेर मोकळ्या जागेत धाव घेतली. परिसरातील अनेक गावांतही भूकंपाच्या या धक्क्यामुळे भयभीत झालेले नागरिक घराबाहेर पडले. त्यानंतर रात्री ३.३० च्या सुमारास पुन्हा नागरिकांनी भूकंपाचा धक्का अनुभवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com