Crime
Esakal
औसा - उसाच्या शेतात शौचास बसल्याच्या कारणावरून एका परप्रांतीय मजुराला शेतमालकाने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.१८) रोजी सकाळी औसा तालुक्यातील वानवडा शिवारात घडली. या प्रकरणी औसा पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. मृत मजुराचे नाव संदीप रामनाथ गौंड (वय-१९, रा. दुधोनिया, ता. हिलगन, जि. सागर, मध्यप्रदेश) असे आहे. तो सीएनजी गॅस पाईपलाईन टाकण्याच्या कामावर मजूर म्हणून कार्यरत होता.