दूध हमीभाव कायदा हा बोलचाच भात अन बोलाचीच कढी- राजू शेट्टी

सुषेन जाधव
शुक्रवार, 4 मे 2018

औरंगाबाद : मुख्यमंत्र्यांनी दूध हमी भाव कायदा केल्याचे जाहीर केले. मात्र कमी दराने खरेदी करणाऱ्या एकाही दूध संघ, संस्थांवर कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवले नाही. मुख्यमंत्री फडवणीस यांची ही भूमिका म्हणजे बोलाचाच भात अन बोलाचीच कढी असल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी (ता. ४) औरंगाबादेत आयोजित पत्रकार परिषदेत केली. 

कोणत्याही आंदोलनात स्वाभिमानाने पुढाकार घेतला की स्वाभिमानी हायजॅक करते असा आरोप केला जातो. त्यामुळे राज्यभर सुरू असलेले दूध उत्पादकांच्या आंदोलनाचे सध्या बारकाईने निरीक्षण करत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात दुधाला समान भाव देण्याची घोषणा हवेतच विरल्याचेही खासदार शेट्टी म्हणाले. राज्याच्या कृषी मंत्र्यांची शेतीविषयक भूमिका विचारल्यानंतर राज्यात कृषी खातेच आहे की नाही माहीत नाही असे शेट्टी म्हणाले. यावेळी जय किसान आंदोलनाचे अविट शहा, वि. एम. सिंग यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती. 

शेतीप्रश्नावर होणार विशेष सभा
शेतीप्रश्नावर लोकसभेत विशेष सभा बोलविणार असून दरम्यान दोन विधेयके मांडणार असल्याचे शेट्टी म्हणाले. त्यामध्ये स्वामिनाथन आयोग व संपूर्ण कर्जमुक्ती याचा प्रामुख्याने समावेश असणार आहे. 

भाजपबरोबर कधीच जाणार नाही
येत्या काळात निवडणूक लढविणार का? या प्रश्नावर शेट्टी यांनी शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या चळवळीला सोबत करेल पण मोदींनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे भाजपबरोबर कधीच जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: The milk affirmation law is meant to be spoken only - Raju Shetty