दुधाच्या दरात एवढी झाली वाढ....

प्रकाश बनकर
सोमवार, 23 डिसेंबर 2019

अमुल कंपनीने दुध विक्री करताना दोन रुपयांची वाढ केली. त्यानंतर राज्यभरातील सर्वच दुध संघांनी दुध विक्रीच्या दरात वाढ केली आहे. याचा परिणाम किरकोळ दुध विक्री करणाऱ्यांवर झाला आहे. पूर्वी 20 रूपयाला येणारे अर्धा लिटरची दुधाच्या बॅगसाठी आता 22 रूपये मोजावे लागत आहे. तर लिटर मागे तीन ते चार रूपयांची वाढ करण्यात येत आहे.

औरंगाबाद : राज्यातील दुध उत्पादक संघांनी दुधाच्या दरात वाढ केली आहे. अमुलसह इतरांनी पॉकिंगच्या अर्धा लिटरच्या दुध बॅगमागे दोन रुपयांची वाढ केली आहे. तर जिल्हा दुध संघाच्या महानंद दुध कंपनीने लिटरमागे दोन रुपये वाढविले आहेत. शनिवारपासून (ता.21) ही वाढ लागू झाल्याचे जिल्हा दुध संघातर्फे सांगण्यात आले. 

अमुल कंपनीने दुध विक्री करताना दोन रुपयांची वाढ केली. त्यानंतर राज्यभरातील सर्वच दुध संघांनी दुध विक्रीच्या दरात वाढ केली आहे. याचा परिणाम किरकोळ दुध विक्री करणाऱ्यांवर झाला आहे. पूर्वी 20 रूपयाला येणारे अर्धा लिटरची दुधाच्या बॅगसाठी आता 22 रूपये मोजावे लागत आहे. तर लिटर मागे तीन ते चार रूपयांची वाढ करण्यात येत आहे.

हेही वाचा : औरंगाबादचे झाले काश्‍मीर  

इतर दुध संघांनी केली दरवाढ

अमुलसह इतर दुध संघांनी ही दरवाढ आठवड्याभरापुर्वी केली. तर काहींनी एक डिसेंबरपासूनच ही दरवाढी केली आहे. मात्र जिल्हा दुध संघांनी तात्काळ दुधाच्या विक्रीच्या किंमतीत दरवाढ केली नाही. या विषयी संचालक मंडळाची बैठक झाली. त्यानंतर विक्रीसाठी लिटरमागे दोन रुपये वाढविण्यात आले. तर दुध उत्पादक शेतकऱ्यांना एक रुपये लिटर मागे वाढवून देण्यात आला असल्याचे जिल्हा दुध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे यांनी सांगितले. 

क्‍लिक करा : ऑनलाईन नोकरीच्या अमिषाने गंडा 

इतरांपेक्षा महानंद शेतकऱ्यांसाठी लाभदायी

दुध उत्पादक शेतकऱ्यांना सरकारच्या दरापेक्षा अधिक दर देत आपले वेगळेपण जपणाऱ्या जिल्हा दुध संघाने दुधाच्या विक्रीत दरवाढ करताना ग्राहक आणि दुध उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करून ही दरवाढ केली आहे. विक्रीसाठी दोन रुपये वाढवले असले तरी, खरेदीसाठी उत्पादक शेतकऱ्यांना लिटर मागे एक रूपया वाढवून देण्यात आला आहे. यामूळे शेतकऱ्यांनासाठी इतर दुध संघापेक्षा महानंद चांगला दर देतो. 

हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना

असे असतील दर 
-महानंदची अर्धा लिटर दुध (पॅकिंग बॅग) पुर्वी 20 रूपयाला यायची. आता 21 रूपयाला येते. -अमुल,सह इतर दुध कंपन्यांची अर्धा लिटरची दुध बॅग पुर्वी 20 रूपयाला यायची आता 22 रूपयाला विक्री होत आहेत. 

जिल्हा दुध संघातर्फे दुध उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांचा विचार करून निर्णय घेतला जातो. संघातर्फे विक्रीसाठी दोन रुपये वाढविण्यात आले. तर खरेदीसाठी एक रूपये वाढविण्यात आला आहे. शेतकऱ्यांचा हिताच्या दुष्टीने संघ नेहमी निर्णय येते. 
-नंदलाल काळे, उपाध्यक्ष, जिल्हा दूध संघ 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The milk price has increased so much ...