दुधाचे दर घसरल्याने दूध उत्पादक शेतकरी संकटात

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून पूर्वी ४८ ते ५० रुपये लिटर प्रमाणे म्हशीचे दूध खरेदी केले जात होते
milk prices
milk pricesmilk prices

-शिवाजी सावंत

देवधानोरा (उस्मानाबाद): दूध खरेदी दरात मोठी घसरण झाल्याने उत्पादक मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच पेरणीचे दिवस तोंडावर आहेत. शिवाय मशागतीचे दर आकाशाला भिडले आहेत. त्यामुळे देवधानोरा भागातील शेतकरी कवडीमोल किमतीत पशुधन विकून बी- बियाणे खरेदी करताना दिसत आहेत.

देवधानोरा, गोविंदपूर, बोरगाव (बु), नागुलगाव, गौरगाव, हासेगाव (शि), एकुरका, जवळा खुर्द, बोरवंटी, भाटशिरपुरासह परिसरातील पशू पालक शेतकरी दुधाला कमी भाव मिळत असल्याने हैराण झाले आहेत. महाराष्ट्रात लॉकडाऊन पूर्वी दुधाचे दर समाधानकारक होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पशुधन वाढवून दुग्ध व्यवसायाचा मार्ग निवडला. परंतु, अचानक टाळेबंदी लागू झाल्याने दुधाचे भाव गडगडले. यातच पशुखाद्याचे भाव मात्र तेजीत आहेत. पशुसंवर्धन करण्यासाठी लागणारा चारा चढ्या भावाने मिळत आहे. तर दुधाच्या पैशातून पेंड आणि भुसा हे पशुखाद्य घेणेसुद्धा अवघड झाल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.

milk prices
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ६५६ बाळांचा सुरक्षित जन्म

खरेदी ४० तर विक्री ५० रुपये
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून पूर्वी ४८ ते ५० रुपये लिटर प्रमाणे म्हशीचे दूध खरेदी केले जात होते. आता हेच दूध ४० ते ४५ रुपये लिटर प्रमाणे खरेदी करून त्याची विक्री ५० रुपयांप्रमाणे केली जात आहे. तर गाईच्या दुधाला केवळ २३ रुपये दर मिळत आहेत. यात शेतकऱ्यांनी कष्ट घेऊनही त्यांच्या हाती काहीच पडत नसल्याचे चित्र आहे.

दुधाचे दर पडल्याने शेतीचा जोडधंदा तोट्यात आला आहे. माझ्याकडे दहा गाई आहेत. परंतु, दुधाला भाव कमी अन् गाईचे संगोपन करण्यासाठी खर्च जास्त लागत आहे. त्यामुळे गाई सांभाळताना नाकीनऊ येत आहेत. आता अनलॉक झाल्याने महाराष्ट्रात दूध संघाकडून दुधाला चांगला दर मिळेल, अशी आशा आहे आहे.
- विलास डिकले, शेतकरी,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com