मिनी मार्केटचे लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

औरंगाबाद - तणावामुळे शिवाजीनगर, टीव्ही सेंटर, जवाहरनगर परिसरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. दोन्ही मिनी मार्केटचे सर्व लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प आहेत, अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिली. शिवाजीनगर येथील नगरसेवक असल्यामुळे येथील सर्व दुकाने नागरिकांनी स्वत:हून बंद ठेवली. तर टीव्ही सेंटर परिसरातही नागरिकांनी दुपारपासून सर्व व्यवहार बंद ठेवला. यात चहा टपरीपासून ते बॅंकाही बंद होत्या. टीव्ही सेंटर येथील काही दुकाने सायंकाळी उघडण्यात आली; मात्र इतरांनी कडकडीत बंद पाळला. जवाहरनगर येथील बाजारपेठही काही तासांसाठी बंद होती. 

वातावरण निवळेपर्यंत दुकाने बंद  - सराफा
शुक्रवारपासून बंद ठेवलेली सराफाची दुकाने सोमवारी उघडण्यात आली होती; मात्र आज पुन्हा वातावरण बदलले. त्यामुळे पुन्हा आम्ही दुकाने बंद केली. आम्ही भीतीच्या वातावरणात आहोत. शहरातील वातावरण पूर्ण निवळेपर्यंत आम्ही दुकाने सुरू करणार नाही, असा निर्णय सराफा असोसिएशनतर्फे घेतल्याचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी सांगितले.

Web Title: Millions of rupees in the mini market stop