नवीन पिढीच्या भवितव्यासाठी आता "एमआयएम'चा पर्याय ः ओवैसी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

सत्ताधारी भाजप-शिवसेना युती सरकारने नवीन पिढीला दिशाहीन केले असून, या पिढीचे भवितव्य घडविण्यासाठी एमआयएम पक्षाचा पर्याय समोर आला आहे,'' असे प्रतिपादन "एमआयएम'चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी बुधवारी (ता. दोन) येथे केले.

पैठण, ता. 2 (बातमीदार) : सत्ताधारी भाजप-शिवसेना युती सरकारने नवीन पिढीला दिशाहीन केले असून, या पिढीचे भवितव्य घडविण्यासाठी एमआयएम पक्षाचा पर्याय समोर आला आहे,'' असे प्रतिपादन "एमआयएम'चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी बुधवारी (ता. दोन) येथे केले.

पैठण विधानसभा मतदारसंघातील एमआयएमचे अधिकृत उमेदवार प्रल्हाद राठोड यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार इम्तियाज जलील, उमेदवार प्रल्हाद राठोड यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. शरीफ पठाण यांनी केले. श्री. ओवेसी म्हणाले, ""सत्तेतील भाजप, शिवसेना सरकारने तुमची मते घेतली; परंतु त्या मोबदल्यात तुम्हाला काय दिले?
धर्मनिरपेक्षता काय आहे, हे या देशाला व महाराष्ट्राला जर कुणी दाखवून दिले असेल तर ते एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी. सर्वसामान्य जनतेचे विकासाचे स्वप्न यापुढे आम्ही पूर्ण करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री दाखवून प्रसिद्धी मिळविण्यासाठीच अमेरिकेत जात आहेत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्तेच्या काळात गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडविले नाहीत.''

हक्काच्या पाण्यासाठी
निवडून द्या ः जलील

इम्तियाज जलील म्हणाले, ""पैठणला जायकवाडी धरण असूनही तालुक्‍यातील जनतेला पिण्यासाठी पाणी मिळत नाही. सत्ताधाऱ्यांना त्याचे सोयरसुतक नाही. हक्काच्या पाण्यासाठी हक्काचा आमदार निवडून द्या. निवडून आल्यानंतर आमचे पहिले काम शेतकऱ्यांना, जनतेला पाणी देण्याचे राहील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MIM Option For New Generation - Owaisi