एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी भाजप संघटनमंत्र्याची गाडी फोडली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. भाजपा नगरसेवकांनी एमआयएम नगरसेवकाला बेदम मारहाण केली होती. त्याचे पडसाद लगेच उमटले. एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयासमोर भाजपा संघटन मंत्र्यांच्या गाडीची तोडफोड करून चालकाला मारहाण केल्याची घटना घडली.

अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी (ता.17) झालेल्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी विरोध केला. त्यावरून भाजप नगरसेवकांनी मतीन यांना बेदम मारहाण केली. या घटनेनंतर मतीन समर्थक महापालिका मुख्यालयासमोर जमा झाले तसेच भाजपा कार्यकर्त्यांचाही मोठा जमाव महापालिकेत जमा झाला होता. भाजप आमदार अतुल सावे यांच्यासह पदाधिकारी पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी गेले. या वेळी भाजपा संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांची स्कार्पिओ गाडी सर्वात मागे होती या गाडीवर मतीन समर्थकांनी जोरदार दगडफेक केली. गाडी चालक विलास काशिनाथ गोराडे यांना फरफटत नेत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. पोलिसांनी हस्तक्षेप करीत बोराडे यांची कार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली. या घटनेमुळे महापालिकेसमोर तणावाचे वातावरण असून, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Web Title: MIM workers destroys car of bjp leader in aurangabad