
रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या, आरोपी फरार
अंबाजोगाई (जि.बीड) : तालुक्यातील पट्टीवडगाव येथे मंगळवारी (ता.दहा) एका अल्पवयीन मुलीने गावातील रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेचा गुरुवारी (ता.१२) बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा झाला आहे. दीपाली रमेश लव्हारे (वय १७, रा. पट्टीवडगाव) असे त्या आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. दीपालीने नुकतीच बारावीची परीक्षा (HSC) दिली होती. तिचे वडील राज्य परिवहन महामंडळात (MSRTC) चालक असून सध्या पालघर येथे कार्यरत आहेत. या मुलीची आई सुमित्रा यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या घराशेजारी राहणारा अकबर बबन शेख हा तरुण मागील काही दिवसांपासून दीपाली कॉम्प्युटर क्लासला येता-जाता तिची छेड काढत होता. (Minor Girl Hanged Herself Due To Road Romeo In Ambajogai Taluka Of Beed)
हेही वाचा: "आमचं घर शिवरायांनी उभं केलंय"; मनसेचं अकबरुद्दीन ओवैसींना प्रत्युत्तर
रस्त्यात अडवून वेडेवाकडे बोलणे, अशा पद्धतीने तो तिला त्रास देत होता. ही बाब दीपालीने आईला सांगितले होती. दरम्यान शुक्रवारी (ता.सहा) दीपालीच्या वडिलांनी अकबरला बोलावून तिला त्रास न देण्याबद्दल बजावले होते. परंतु त्याच्या वागणुकीत फरक पडला नाही. त्याचे त्रास देणे सुरु असल्याचे दीपालीने आईला सांगितले होते. त्यावर वडील आणि भाऊ आला की आपण मार्ग काढू, अशी आईने तिची समजूत घातली. अखेर सततच्या त्रासाला कंटाळून दीपालीने मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास आई गावातील एका कार्यक्रमास गेली होती. (Beed)
हेही वाचा: हिंदू, मुस्लिम, शीख आणि जैन समाजानं बनलाय भारत - अकबरुद्दीन ओवैसी
त्यामुळे दीपालीने घरात कोणी नसताना घराच्या माळवदाच्या आडुला साडीने गळफास घेतला. रात्री उशिरा तिची आई घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. नातेवाईकांच्या मदतीने तिला स्वाराती रुग्णालयात दाखल केले, परंतु तिथे डॉक्टरांनी तपासल्यावर तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अशा तक्रारीवरून अकबर बबन शेख याच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, हा गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून अद्याप त्याला अटक झाली नव्हती. घटनेचा तपास बर्दापूर सहायक पोलिस निरीक्षक श्री. खरात हे करत आहेत.
Web Title: Minor Girl Hanged Herself Due To Road Romeo In Ambajogai Taluka Of Beed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..