बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दाेघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

पिंपळनेर पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात आई-वडील ऊसतोडीसाठी परराज्यात गेलेले असल्याने पीडित अल्पवयीन मुलगी लहान बहीण-भावासोबत गावात राहत होती. तिच्यावर अत्याचार करणाऱ्यास अटक केली आहे. या प्रकरणात दाेघांना सोमवारपर्यंत सुनावली पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

बीड - बीड तालुक्‍यातील अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा उचलत अत्याचार करून फरारी असलेल्या आरोपींना पिंपळनेर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोघांनाही तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

पिंपळनेर पोलिस ठाणे हद्दीतील एका गावात आई-वडील ऊसतोडीसाठी परराज्यात गेलेले असल्याने पीडित अल्पवयीन मुलगी लहान बहीण-भावासोबत गावात राहत होती. ती आठ तारखेला सकाळी कापूस वेचण्यासाठी जाताना कोणीही नसल्याची संधी साधून ज्ञानेश्‍वर मोमीन याने सदरील मुलीवर अत्याचार केला. यानंतर मुलीस पोटात दुखू लागल्याने एका मित्राच्या साह्याने अगोदर वडवणी येथे उपचारासाठी नेले; मात्र त्या डॉक्‍टरने उपचार करण्यास नकार दिल्यानंतर बीड येथे उपचार केले.

हेही वाचा - माजलगावात द बर्निंग ट्रक, अचानक घेतला पेट

हा प्रकार मुलीने भावाला सांगितला. यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला. यानंतर आरोपी फरारी झाले. पाच दिवसांनंतर शुक्रवारी (ता. 13) पिंपळनेर पोलिसांनी मुख्य आरोपी ज्ञानेश्‍वर मोमीन यास माजलगाव येथून, तर त्याचा साथीदार शंकर मोरे यास वडवणीजवळून अटक केली आहे. यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही तीन दिवसांची सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक शरद भुतेकर यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minor girl tortured, two arrested