...अन् मुलगा चार दिवसांनी घरी परतला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

लातूर : शिक्षणासाठी लातुरात आलेल्या विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याची बातमी शहरात वेगाने पसरत असतानाच हे अपहरण नसून अभ्यासाच्या ताणामुळे मुलगा घरातून पळून गेल्याची आश्‍चर्यकारक माहिती पुढे आली आहे. चार दिवसांनी तो परत आल्याचेही कुटुंबीयांनी आणि पोलिसांनी स्पष्ट केले. 

नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी (ता. बिलोली) येथील एक विद्यार्थी लातुरात शिक्षणासाठी आला होता; मात्र त्याची अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार गांधी चौक पोलिस ठाण्यात पित्याने दिली होती. शिवम सुरेश दुगमोड (वय 15) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. लातुरातील पिनाटेनगर भागात तो आपल्या आई आणि बहिणीसोबत राहत होता. 

रेल्वे स्टेशनला जाऊन येतो, असे म्हणून तो 26 डिसेंबर रोजी घराबाहेर पडला. तेव्हापासून तो परत आला नाही. म्हणून वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली. दरम्यान, शिवमने वडिलांना दूरध्वनी करून आपण अनंतपूर येथे सुरक्षित असल्याचे सांगितले. तिथून वडिलांनी त्याला रविवारी (ता. 30) पहाटे परत लातुरात आणले. शिवम हा दहावीला आहे. अभ्यास कर, मोबाईल सारखा वापरू नको, असे पालकांनी सांगितले होते. त्यामुळे तो रागारागात घरातून पळून गेला होता. 

Web Title: missing boy come to the home after 4 days