मिस्त्रीनेही घेतली बक्षीस म्हणून लाच... 

file photo
file photo

नांदेड : केलेल्या कामाचे बक्षीस म्हणून ७०० रुपये स्विकारणारा बांधकाम मिस्त्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात मंगळवारी (ता. १४) येथील कामगार नोंदणी कार्यालयासमोर अडकला. त्याच्याविरुध्द वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

देगलुर येथे राहणारा व कामगार नोंदणी कार्यालयात दलाली काम करणारा बांधकाम मिस्त्री केशव गणपतराव टोकलवाड (वय ३७) हा मंगळवारी एसीबीच्या जाळ्यात अडकला. त्याचे झाले असे की, महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई, नांदेड विभाग येथून कामगार नुतनीकरण करण्याचे काम व शासनाच्या वतीने चार हजार २०० रुपये बांधकाम कामगार म्हणून साहित्य खरेदी करण्यासाठी रक्कम मिळवुन दिली. त्याबद्दल बांधकाम मिस्त्री श्री. टोकलवाड याने तक्रारदाराकडे सातशे रुपयाची बक्षीसाच्या स्वरुपात लाच मागितली.


सातशे रुपये घेताना रंगेहात जाळ्यात


परंतु हे बक्षिस देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने सोमवारी (ता. १२) जानेवारी रोजी एसीबी कर्यालयात येऊन तक्रार दिली. याआधारे एसीबीच्या पथकाने या तक्रारीची पडताळणी केली. पडताळणी सापळ्यात केशव टोकलवाड याने बक्षिस म्हणून सातशे रुपयाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यावरून मंगळवार कामगार नोंदणी कार्यालयासमोर एसीबीच्या पथकानी सापळा लावला. दुपारी तीन वाजता खासगी व्यक्ती केशव टोकलवाड हा सातशे रुपये घेताना रंगेहात जाळ्यात अडकला. ही कारवाई पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कपील शेळके, कर्मचारी एकनाथ गंगातिर्थ, जगन्नाथ आनेराव, अनिल कदम आणि विकास राठोड यांनी केली. 

विजेचा धक्का लागल्याने एकाचा मृत्यू 

नांदेड : घराच्या छतावर सुरू असलेल्या बांधकामावर विजेच्या ताराला धक्का लागून एकाचा मृत्यू झाला. ही घटना सिडको भागात सोमवार (ता. १३) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. 

सिडकोच्या एनडी- दोनमध्ये एका घराचे बांधकाम सुरू आहे. छतावर सुरू असलेल्या बांधकामावर बालाजी विश्‍वनाथ परळे (वय ५०) हा कामावर होता. सोमवारी दुपारी काम करीत असताना बांधकामाशेजारी विज वितरण पुरवठा करणारी तार होती. त्या तारेला बालाजी परळे यांच्या हाताचा स्पर्श झाला. यात त्यांना जबर धक्का लागला. त्याला लगेच विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू करण्यापैकी त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय सुत्रानी सांगितले. या प्रकरणी गणेश मुंकुंदा रपळे यांच्या माहितीवरून नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलीहे. तपास पोलिस हवालदार सय्यद महेमुद करीत आहेत. 
    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com