मुख्यमंत्र्यांनी सत्तारांना घेतले रथात ; पक्षात जाण्याचा मार्ग मोकळा 

महाजनादेश यात्रेत देवेंद्र फडणवीस  व आमदार अब्दुल सत्तार
महाजनादेश यात्रेत देवेंद्र फडणवीस व आमदार अब्दुल सत्तार

औरंगाबाद: कॉंग्रेसेच बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशावरून सुरु असलेला गोंधळ आता दुर होण्याची शक्‍यता आहे. कारण बुधवारी (ता.28) सिल्लोडला आलेल्या मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेत देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अब्दुल सत्तार यांना हात देत रथात बसविले. मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी सत्तार यांनी मोठे शक्‍तीप्रदर्शन केले होते. रथातील मिळालेल्या जागेमुळे आता सत्तार यांचा भाजप प्रवेशातील मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. 


मुख्यमंत्र्याची महाजनादेश औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी तयारी केली होती. सिल्लोड येथे मुख्यमंत्र्याची स्वागतावरून सत्तार आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. प्रियदर्शनी चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वागत करणार होते. त्याच ठिकाणी सत्तारने स्वागत केले. बुधवारी फुलंब्रीच्या जाहीरसभेनंतर महाजनादेश यात्रा सिल्लोडकडे रवाना झाली.

सिल्लोड शहरात दाखल होताच. सत्तार व त्यांच्या समर्थकांनी मोठे शक्‍तीप्रदर्शन केले. मुख्यमंत्र्याची यात्रा आल्यानंतर स्वागतासाठी सत्तारांनी रथ थांबवली. तेव्हा खुद्द मुख्यमंत्र्यांनी आमदार अब्दुल सत्तार यांना रथात बसविले. कारखाना येथील भवन येथून आमदार सत्तार रथमध्ये बसले. यावेळी रथात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची उपस्थिती होती. 

सत्तारला विरोध कारणाऱ्यांमध्ये नाराजी 

अब्दुल सत्तार यांना भाजपात घेऊ नयेत अशी मागणी करणारे भारतीय जनता पक्षाचे तालुक्‍यातील पदाधिकाऱ्यांसमोरच सत्तार मुख्यमंत्र्याच्या वाहनात बसत शक्‍ती प्रदर्शन केले. त्यामुळे सत्तार विरोधी लोक नाराज झाले आहेत. भाजपपेक्षा सिल्लोड शहरात सत्तार समर्थकांची मोठी गर्दी होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com