आमदार श्री. कल्याणकर यांचा पारा चढला - काय आहे प्रकरण वाचा  

photo
photo
Updated on

नांदेड : यशोदा माता पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेवरील नावावरून जिल्हा महाविकास आघाडीमध्ये चांगलीच खडाजंगी सुरू आहे. महाविकास आघाडीच्या शिवसेनेकडे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद असून सर्वदहा सदस्य सत्तेत सहभागी आहेत. महिला व बालकल्याण समितीच्या वतीने जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित यशोदा माता पुरस्कार वितरण सोहळा आयोजीत करण्यात आला होता.  

कार्याक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेवर हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांच्यासह सथानिक आमदारांच्या नावांविषयी प्रोटोकॉल पाळण्यात आले नसल्याच ठपका ठेवून नांदेड - उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांना जाब विचारला.‘निमंत्रणपत्रिकेत आमदारांचा प्रोटोकॉल काय आहे ते तुम्ही मला त्वरित सांगा,’ असे म्हणत चांगलेच धारेवर धरले. 

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने भक्ती लॉन्समध्ये ‘बेटी बचाव बेटी पढाव’ यशोदामाता २०२० पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने निमंत्रणपत्रिका छापण्यात आल्या. मात्र, या निमंत्रणपत्रिकेवर शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांचा नामोल्लेख नव्हता. याशिवाय नांदेड - उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर यांचे नाव प्रोटोकॉलप्रमाणे घेण्यात आले नाही.  त्यामुळे आमदार श्री. कल्याणकर यांचा पारा चढला. 

आमदाराचा प्रोटोकॉल काय
कार्यक्रम पार पडल्यानंतर आमदार श्री. कल्याणकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांना चांगलेच फैलावर घेतले. दरम्यान, कार्यक्रमाची पत्रिका बनवताना आपण लक्ष दिले नाहीत का, असा प्रश्न उपस्थित करत विद्यमान आमदाराचा प्रोटॉकल काय असतो, त्याचे नाव पत्रिकेवर कितव्या क्रमांकाला घ्यायचे असते हे मला सांगा, अशी विचारणा करत आमदार बालाजी कल्याणकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांना चांगलेच धारेवर धरले. 

यापुढे असा प्रकार खपवून घेणार नाही -
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. काकडे यांनी पत्रिका तयार करताना मी नव्हतो. मी त्याकडे लक्ष देऊ शकलो नाही, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमदार श्री. कल्याणकर यांनी शिवसेना जाब विचारत यापुढे असा प्रकार खपवून घेणार नसल्याचा इशाराही दिला.

राष्ट्रवादीनेही फिरवली पाठ

महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या यशोधामाता पुरस्कार वितरण सोहळ्यावर बहिष्कार टाकत शिवेसनेचा एकही पदाधिकारी पुरस्कार वितरण सोहळ्याकडे फिरकला नाही. दस्तूरखुद्द जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा पद्मा सतपलवार जिल्हा परिषदेचा कार्यक्रमाकडे पाठ फिरवत सावित्रीबाई फुले मुलींची अंध शाळेतील विद्यार्थिनींसमवेत महिला दिन साजरा केला.  शिवसनेच्या जाहीर बहिष्काराची री ओढत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनही सोहळ्याकडे पाठ फिरविली. 

सन्मानजनक वागणूक नाही -  
महाविकास आघाडीचे नावाने जिल्हा परिषदेत सत्तारूढ झालेल्या काँग्रेसने राष्ट्रवादीला सोईस्कर सत्तेबाहेर लोटले. सत्तेत सहभागी शिवसनेलाही आता दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे कार्यक्रमप्रसंगी झालेल्या भाषणावरून दिसून येते. सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याने कार्यक्रमाकडे फिरकलो नाहीत. 
समाधान जाधव, राष्ट्रवादी गटनेते 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com