नांदेडला गुरुद्वारामध्ये होळी महोत्सव सुरु

गुरुद्वारात होळी महोत्सव
गुरुद्वारात होळी महोत्सव
Updated on

नांदेड - मुख्य तख्त सचखंड गुरुद्वारा श्री हजुरसाहेब येथे पारंपरिक होळी महोत्सवास सुरुवात झाली असून भाविकांची संख्या वाढली आहे. गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्ड प्रशासनाने भाविकांच्या सेवेसाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले आहेत. विविध यात्री निवास, लंगर, हॉस्पिटल आणि गुरुद्वारा प्रवेशद्वारांवर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच कोरोना वायरसविषयी सर्वांना काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे. 

नांदेडच्या मुख्य सचखंड गुरुद्वारात दरवर्षी पारंपारिक होळी हल्ला महल्ला हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. येथे सण साजरा करण्यासाठी देशा - विदेशांतून शीख भाविक येतात. या वर्षी देखील होळी सण साजरा करण्यासाठी भाविकांची संख्या वाढली आहे. गुरुद्वारा गेट क्रमांक एक आणि दोन येथे भाविकांची गर्दी वाढली आहे. तसेच गुरुद्वाराच्या यात्री निवास परिसरात संतबाबा सुलखनसिंघ पंजवाडवाले यांनी भाविकांसाठी लंगर सेवा सुरु केली आहे. तसेच आरोग्य तपासणी केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. 

भाविकांना सेवा सुविधा उपलब्ध
गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष भूपिंदर सिंघ मिनहास यांच्या मार्गदर्शनात गुरुद्वारा बोर्डाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सेवा सांभाळली आहे. यात्री निवास, दशमेश हॉस्पिटल, लंगर येथे भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रविंद्रसिंघ बुंगई आणि सर्व स्थानिक गुरुद्वारा बोर्ड सदस्य होळी सणानिमित्त मार्गदर्शन करत आहेत. गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरविंदरसिंघ वाधवा, प्रशासकीय अधिकारी डी. पी. सिंघ यांच्यासह सर्व अधिकारी आणि विभागप्रमुख होळी महोत्सवानिमित्त सक्रिय सेवा बजावत आहेत. सोमवारी (ता. नऊ) होळीचा सण साजरा होणार आहे तर मंगळवारी (ता. दहा) होला हल्ला महल्ला यात्रा निघणार आहे. 


पंजप्यारे साहिबान यांच्या शुभेच्छा 
मुख्य सचखंड गुरुद्वारात शनिवारी (ता. सात) जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी, मीत जत्थेदार ज्योतींदरसिंघजी, हेडग्रंथी भाई कश्‍मीरसिंगजी, भाई अवतार सिंघजी शीतल, धुपिया भाई रामसिंघजी आणि इतर धार्मिक मंडळीनी भाविकांवर गुलाल उधळून होळीचे क्षण साजरे केले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या. 

कीर्तन दरबार सुरु 
होळी सणानिमित्त गुरुद्वारात शनिवारी (ता. सात) सकाळी विशेष कीर्तन दरबार कार्यक्रमास सुरुवात झाली. पंजाब येथून आलेले डाढी जत्था, कवीश्वर यांनी धार्मिक कार्यक्रम आणि कीर्तन केले. यात भाई गुरनामसिंग मल्ली, भाई लखविंदरसिंघ राय, भाई स्वरणसिंघ भौर, भाई नानकसिंघ झबाल, भाई धर्मसिंघजी, भाई गुरुचरणसिंघ चनधारीवाल, भाई हरभजनसिंघ रतनगढ, भाई रंजितसिंघ पन्नू, भाई मिल्खासिंघ मुसाफिर, भाई सरबजीतसिंघ बालीया यांनी विविध कार्यक्रम सादर केले. गुरुद्वारात सकाळी आणि रात्री भाविकांसाठी कीर्तनदरबार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com