मग या आमदारांनीच सोडविला पतीच्या वाढलेल्या केसांचा प्रश्न

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 April 2020

लॉकडाऊनमुळे जसे विविध घटकांसमोर विविध प्रश्न निर्माण केले. तसे, वाढलेल्या केसांमुळे डोक्यात होणारी वळवळ कोणालाही शांत बसू देत नाही. तसाच प्रश्न आमदार नमिता यांचे पती अक्षय मुंदडा यांनाही सतावत होता.

बीड : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सुरू असलेले लॉकडाऊन आणि टाळेबंदीमुळे विविध घटकांसमोर विविध समस्या उभ्या केल्या आहेत. परंतु, वाढलेल्या केसांची वळवळ हा सर्वांचाच कॉमन प्रश्न आहे. परंतु, पती अक्षय मुंदडा यांच्या वाढलेल्या केसांचा प्रश्न खुद्द आमदार नमिता मुंदडा यांनीच सोडविला. त्यांनीच हाती कात्री घेऊन पतिराजांचा परफेक्ट हेअरकट केला.

सध्या कोरोना विषाणूचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे अनेक प्रश्न समोर येत आहेत. केज मतदार संघातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आमदार नमिता मुंदडा जातीने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदार संघातील रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आदींना पीपीई किटसह मास्क, सॅनिटायझर या सुरक्षा उपकरणांसाठी ५० लाख रुपयांचा निधी दिला. तसेच कोरोना लढ्यासाठी एक महिन्याचे वेतनही दिले.

आई गेल्याचं दुःख मोठं, पण गोडजेवण घालण्याऐवजी यांनी...

त्यांच्या मतदार संघातील अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात असणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांचे लॉकडाऊनमुळे होणारी अडचण दूर करण्यासाठी स्वत: दीड लाख रुपये व त्यांच्या अखत्यारीत असलेल्या संस्थांकडून दोन लाख रुपयांचा निधी देऊन ४०० लोकांचा महिनाभराचा चहा, नाश्ता व जेवणाचा प्रश्न सोडविला. रुग्णालय व पोलिसांना स्वत: सॅनिटायझरही वाटप केले. आता लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या इंधनाचे प्रश्न, सामान्यांच्या राशनच्या प्रश्नासाठीही त्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सोडवणुकीचा प्रयत्न करतात. 

पळून गेलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना पोलिसांनी...

दरम्यान, लॉकडाऊनमुळे जसे विविध घटकांसमोर विविध प्रश्न निर्माण केले. तसे, वाढलेल्या केसांमुळे डोक्यात होणारी वळवळ कोणालाही शांत बसू देत नाही. तसाच प्रश्न आमदार नमिता यांचे पती अक्षय मुंदडा यांनाही सतावत होता. मग, आमदार नमिता मुंदडा यांनी स्वत: हातात कात्री घेऊन अक्षय मुंदडा यांच्या डोक्यावरचे केस व्यवस्थित कापले. डोक्यावर वळवळ करणारे केस कमी झाल्याने अक्षय मुंदडा यांनाही हायसे वाटले आणि मग त्यांनीही आमदार पत्नी नमिता मुंदडांचे कौतुक केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Namita Mundada Made Haircut Of Husband Akshay Mundada Beed News