MLA Vilas Bhumare and mp sandipal bhumare
sakal
पाचोड - पावसाने तब्बल पन्नास दिवसांचा खंड दिल्याने खरीप हंगामातील पिकांवर मोठे संकट ओढावले आहे. पावसाअभावी सोयाबीन, कपाशी, मका, बाजरी यासह विविध पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके वाया गेल्यान पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी गुरुवारी (ता. २४) सकाळी मुरमा व लिंबगाव येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.