मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरांची टोळीला अटक

फोटो
फोटो

नांदेड : हिंगोली जिल्ह्यात मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरून त्या नांदेडमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना एका चारचाकी वाहनासह ताब्यात घेतले. त्यांना कुरुंदा (ता. वसमत) पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केळी मार्केट परिसरात गुरूवारी (ता. २७) सकाळी केली. 

नांदेड शहर व जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपीच्या शोधात निघालेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांना या टोळीची गुपत् माहिती मिळाली. त्यांनी पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना सांगितले. त्यांनी या पथकाला सुचना दिल्या. यावरून श्री भारती यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जुना मोंढा परिसरात असलेल्या इतवारामधील केळी मार्केटमध्ये सापळा लावला. यावेळी महापालिकेच्या रुग्णालयाजवळ संशयास्पद स्कारपीओ (एमएच२६-व्ही- ४६४५) ही उभी दिसली. 

मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरल्याची कबुली

पाळत ठेवत या गाडीतील तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून काही चोरीच्या बॅटऱ्याही जप्त केल्या. या बॅटऱ्यासंदर्भात त्यांना विचारले असता त्यांनी सुरवातीला उडावउडवीचे उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर करताच त्यांनी पोपटासारखे बोलून केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. कुरुंदा (ता. वसमत) परिसरातील मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली. यानंतर कुरुंदा पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे या प्रकरणाचा गुन्हा दाखल झालेला होता.

कुरूंदा (जिल्हा हिंगोली) पोलिसांच्या स्वाधीन
 
ताब्यात घेण्यात आलेल्यामध्ये हाजी अकबर हजी अब्दुल समद (वय २७), महमद शारुख महमद सईद (वय २६) दोघे रा. केळी मार्केट, रजानगर, नांदेड आणि महमद मुस्तफा महमद मनान (वय २४) रा. दुध डेअरी, नांदेड यांचा समावेश आहे. या तिन्ही आरोपींना कुरुंदा पोलिस ठाण्याच्या फौजदार श्रीमती बोधनकर यांच्या स्वाधीन केले. 

यांनी घेतले परिश्रम


पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती, सहाय्यक फौजदार जसवंतसिंग शाहू, शेख रब, हवालदार मारोती तेलंग, संजय केंद्रे, सखा नवघरे, शंकर म्हैसनवाड, राजू पुल्लेवाड, तानाजी येळगे, बजरंग बोडके आणि विलास कदम यांचा सहभाग होता.       

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com