esakal | हिंगोली जिल्‍ह्यात पावसाची दमदार हजेरी
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli photo

आठ दिवसाच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी जिल्‍ह्यात पावसाचे आगमन झाले. बुधवारी (ता.दहा) मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांनी आता पेरणीची तयारी सुरू केली आहे. दुपारी दोन वाजता सुरू झालेली पावसाची रिमझीम रात्री उशीरापर्यत सुरू होती

हिंगोली जिल्‍ह्यात पावसाची दमदार हजेरी

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्‍ह्यात आठ दिवसानंतर बुधवारी (ता.दहा) मेघगर्जनेसह पावसाचे दमदार आगमन झाले. दुपारी दोन वाजता सुरू झालेली पावसाची रिमझीम रात्री उशीरापर्यत सुरू होती. हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव शहरासह तालुक्‍यात सर्वदूरपर्यंत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली आहे. 

जून महिण्याच्या सुरवातीला तीन दिवस सलग पाऊस झाला. त्‍यांनतर पावसाने उघडीप दिली. आठ दिवस वातावरण चांगलेच तापले होते. आठ दिवसाच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी जिल्‍ह्यात पावसाचे आगमन झाले. मृग नक्षत्र लागून तीन दिवसाचा कालावधी झाला.  या नक्षत्रात पेरणी व्हावी अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत.

हेही वाचालॉकडाउनमुळे दोन महिन्यानंतर दरवळतोय सुंगध 

दुपारीपासून ढगाळ वातावरण

अनेकांनी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करून पेरणीची तयारी सुरू केली आहे. शहरातील कृषी केंद्रावर शेतकरी बियाणे, खते व औषधी खरेदी करीत आहेत. 
पेरणी योग्य पाऊस होताच पेरण्यांना सुरवात केली जाणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. दरम्‍यान, बुधवारी दुपारी दोन वाजेपासून वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाऊस सुरू झाला. 

हिंगोली, कळमनुरी तालुक्यात पाऊस

हिंगोली शहरासह तालुक्‍यातील अंधारवाडी, बळसोंड, पिंपळखुंटा, कारवाडी, कोथळज, खांबाळा, बोराळा, बांसबा, सिरसम, फाळेगाव, कनेरगाव नाका, मोप आदी गावांत पावसाने हजेरी लावली. कळमनुरी शहरासह तालुक्‍यातील वारंगाफाटा, आखाडा बाळापूर, शेवाळा, जामगव्हाण, सुकळीवीर, चुंचा, फुटाणा, तोंडापूर, पोतरा, बोल्‍डा, येहळेगाव गवळी, असोला आदी गावांतही पावसाने हजेरी लावली. 

रात्री उशीरापर्यंत पावसाची रिमझीम

तसेच सेनगाव शहरासह तालुक्‍यातील गोरेगाव, केंद्रा, बटवाडी, जवळा बुद्रुक, वसमत शहरासह तालुक्‍यातील कुरुंदा, हट्टा, बोरी, करंजाळा, हयातनगर व औंढा नागनाथ शहरासह तालुक्‍यातील गोळेगाव, साळणा, गोजेगाव, केळी येथेही पाऊस झाला. रात्री उशीरापर्यंत पावसाची रिमझीम सुरू होती. 

शेतकऱ्यांची पेरणीची तयारी 

पाऊस होत असल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीत आहेत. मोठा पाऊस होताच पेरण्या सुरू करणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मृग नक्षत्रात मूग, उडीद या डाळवर्गीय पिकांची पेर फायदेशीर ठरणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या वर्षी सोयाबीनचा अधिक पेरा केला जाणार असल्याचे दिसून येत असून त्‍याप्रमाणे शेतकरी तयारीला लागले आहेत. 

येथे क्लिक कराअबब... ८४ प्रकल्प गाळमुक्त -

जिल्‍ह्यात ५२ हजार टन खत उपलब्ध

जिल्‍ह्यात खरिपातील पेरणीची तयारी पूर्ण झाली असून मंगळवारी (ता. नऊ) मालगाडीने २६ हजार टन खताची आवक झाली आहे. यापूर्वीदेखील २६ हजार टन खत दाखल झाला आहे. शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी जमिनीची मशागत करून ठेवली असून सध्या बियाणे व खत खरेदीत मग्न झाले आहेत. 

अधिकाऱ्यांची उपस्थिती

यावेळी जिल्‍हा कृषी अधिकारी विजय लोखंडे, तालुका कृषी अधिकारी श्री. बंडेवार यांच्यासह मान्यवरांची उपस्‍थिती होती. उपलब्ध झालेले खत जिल्‍ह्यातील कृषी केंद्रांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी सांगितले. पाऊस होताच पेरणीला सुरवात केली जाणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.