esakal | मोदींची सुरू आहे हिटलरशाही, शेतकरी नेते युधवीर सिंह यांची टीका | Osmanabad News
sakal

बोलून बातमी शोधा

उमरगा (जि.उस्मानाबाद) - किसान संवाद कार्यक्रमात बोलताना शेतकरी नेते युधवीर सिंह. यावेळी उपस्थित राकेश टिकेत

मोदींची सुरू आहे हिटलरशाही, शेतकरी नेते युधवीर सिंह यांची टीका

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद)  : केंद्रातील सरकार हुकूमशाही पद्धतीने वाटचाल करीत आहे.  सरकार अदानी, अंबानी यांचे हित जोपासणारे असून शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हिटलरशाहीचे अनुकरण करित असुन कोरोना महामारीच्या आडून चोर दरवाजाने येऊन शेतकऱ्यांच्या विरोधात तीन कायदे (Farm Bills) संमत करून घेतले, अशी टीका शेतकरी नेते युधवीर सिंह (हरियाणा) यांनी केली. उमरगा शहरात शनिवारी (ता. दोन) आयोजित करण्यात आलेल्या किसान संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले श्री. सिंह आणि शेतकरी नेते राकेश टिकेत (Farmer Leader Rakesh Tikait) यांनी आदर्श महाविद्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी अॅड. उदयसिंह गवारे, शेतकरी संवाद मेळाव्याचे संयोजक विनायकराव पाटील (Umarga) यांच्यासह रामकृष्णपंत खरोसेकर, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड यांची उपस्थिती होती.

हेही वाचा: औरंगाबादेत पुरात अडकलेल्या आईसह चिमुकल्याला ग्रामस्थांनी वाचवले;पाहा व्हिडिओ

श्री. सिंह म्हणाले की, देशातील अनेक प्रकल्प विक्रीसाठी काढले आहेत. एलआयसी, भारत पेट्रोलियम, बीएसएनएल, रेल्वे आदी अनेक संस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे, येणाऱ्या काळात सर्व देश विकायला काढला जाईल. शेतकरी विरोधी कायद्याला २०१२ मध्ये विरोध करणारे भाजपाचे नेते आता सत्तेत येऊन त्याचे समर्थन करताहेत. तीन कायदे देशातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, व्यापारी, नोकरदार यांना रसातळाला घेऊन जात आहेत. देशातील शेतकऱ्यांना जाती, धर्माच्या नावाने गुंतवून ठेऊन शेतकरी विरोधी कायदे केले जात आहेत. संसदेत विरोध करणाऱ्याला बाहेर फेकले जात असुन कायदे समंत करताना राज्यसभा व लोकसभेत चर्चा करून कायदा पास केला जातो, पण कोणाचे काहीच ऐकून न घेता दडपशाहीने, हिटलरशाही पद्धतीने कामकाज केले जात असल्याचा घणाघात त्यांनी केला.

.....तरच घर वापसी !

शेतकऱ्यांचे अंदोलन दहा महिन्यापासून चालू आहे, कोठपर्यत चालेल असे विचारले असता, राकेश टिकेत यांनी जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांच्यासाठी जाचक असलेले तीन कायदे रद्द करत नाही तोपर्यंत अंदोलन चालणार. देशातील अनेक शेतकऱ्यांचा या अंदोलनाला पाठींबा मिळत आहे. जब तक कानून वापसी नहीं तब तक घर वापसी नहीं असे ते म्हणाले.

हेही वाचा: हिंगोलीत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस; कयाधू, पैनगंगा दुथडी वाहतायत

loading image
go to top