मोदी म्हणजे हिटलरचाच पुनर्जन्म - जितेंद्र आव्हाड

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद - ""नागरिकत्वच्या मुद्यावरून आज मुस्लिमाकडे संशयाने बघण्याची गरज नाही. कितीतरी हिंदूकडेही पुरावे सापडणार नाहीत. 1935 मध्ये हिटलरने देखील असाच कायदा केला होता. आता हिटलरचा पुनर्जन्म पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यांना दुसऱ्यांच्या घरात डोकावून पाहायला खूप आवडते; मात्र त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी इंग्रजांना जसे बिगर हत्याराने पळविले तसेच तुम्हालाही पळवू'', असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला. 

सुधारित नागरिकत्व कायदा, एनआरसीच्या विरोधात एनआरसी व सीएए विरोधी कृती समितीतर्फे शुक्रवारी (ता. 27) आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत महामोर्चा काढण्यात आला. मोर्चासाठी विभागीय आयुक्त कार्यालय ते आमखास मैदानापर्यंत मोठी गर्दी जमली होती. मोर्चानंतर झालेल्या सभेचा समोराप आमदार आव्हाड यांच्या भाषणाने झाला. त्यांनी केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टिकास्त्र सोडले.

ते म्हणाले, आंबेडकरवादी जीवंत राहीले नाहीत तर गोळवलकरांचा पुनर्जन्म होईल. त्यांना संविधान मंजूर नव्हते. हा लढा हिंदू - मुस्लिम नव्हे तर हेडगेवार, गोलवलकर यांच्या विचारांच्या विरोधातील आहे. जब तक तिरंगा रहेगा, तब तक ऐ देश हमारा रहेगा.. जय जय जय जय भिम, यासह त्यांनी संविधान बचावचा नारा दिला. त्यास उपस्थितांनी जोरदार घोषणांसह प्रतिसाद दिला. 

या मोर्चात सर्वधर्मीय लोक उपस्थित होते. मुस्लिम बहूल भागातील अनेक दुकाने दुपारनंतर बंद ठेवण्यात आली होती. आंदोलनाच्या स्थळी रस्त्यावर मोठी गर्दी असल्याने वाहतूक सुरळीत राहण्यासाठी बॅरिकेटस लावण्यात आले होते. तसेच मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती ही लक्षणीय होती. आंदोलकांनी विविध घोषवाक्‍य असलेले हाती घेतलेले फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच अनेकांनी महापुरुषांचे फोटो घेऊन आंदोलनात सहभाग नोंदविला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर, राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्‍ते खासदार मनोज झा, तसेच इतरांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. यावेळी मंचावर उषा दराडे, सुभाष लोमटे, अफसरखान, सुरजितसिंग खुंगर, कदीर मौलाना, अण्णासाहेब खंदारे, जियाउद्दीन सिद्धीकी, अब्दुल वाजेद कादरी, आमदार जिशान सिद्धीकी, शोएब कादरी आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थिती होती. 

लढाई खूप मोठी ः ऍड. प्रकाश आंबेडकर 
ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, ""ही लढाई खूप मोठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा हे दोघे म्हणतात की एनआरसीवर चर्चा झाली नाही. एनआरसी लागू करायची नसेल तर मग डिटेंशन कॅम्प कशासाठी बांधले जात आहेत. खारघरमधील डिटेंशन कॅम्पसाठी जी जागा निवडली तेथे पाच लाख लोकांना ठेवले जाऊ शकते.

तत्कालीन सरकारने ही जागा निवडली होती. सीएए, एनआरसी हा कायदा मुस्लीम विरोधी आहे हे सत्य असले तरी याचे 40 टक्के हिंदू बांधव शिकार होतील. हा कायदा संविधान विरोधीसुद्धा आहे. आपल्याला आता न्यायालयाच्या आशेने पाहता येणार नाही. न्यायालयात जाणे म्हणजे दगडावर डोके आपटून घेण्यासारखे आहे. ही लढाई खूप लांब आहे जी 2024 पर्यंत चालेल. आता सर्वांनी जागृत व्हावे'', असे आवाहन त्यांनी केले. 
--- 
आता शांत नव्हे, लढणार : मनोज झा 
मनोज झा म्हणाले, ""या देशाच्या मातीशी प्रेम करणाऱ्यांसाठी ही आरपारची लढाई आहे. आता तुम्हाला नागरिकत्व कायदा परत घ्यावाच लागेल. तुम्ही काय आम्हाला आमच्या कपड्यांवर ओळखणार? तुम्हाला आम्ही तुमच्या चरित्र्यावरून ओळखतो. तुम्ही अनेक कायदे केले आम्ही शांत राहिलो; मात्र संविधान तोडणारा कायदा केल्यावर आम्ही आमचे दुःख घेऊन रस्त्यावर उतरलो आहोत.

आता देशाचे संविधान तुमच्या हातात सुरक्षित नाही. तुमची विचारधारासुद्धा संकुचित आहे. सीएए, एनआरसीविरुद्धची लढाई ही आपल्या सर्वांची आहे. संविधानासाठी आम्ही रक्तसुद्धा सांडायला तयार आहोत. त्यांचा प्रयत्न आहे आंदोलन हिंसक व्हावे; मात्र आम्ही शांततेच्या मार्गाने लढाई लढू. तुम्ही जर कागदपत्रे मागायला आला तर आम्ही तुम्हाला तिरंगा दाखवू तोच आमचा सर्वांत मोठा कागद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com