वसमतचे उपनगराध्यक्ष सीताराम म्यानेवारांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

वसमत नगरपालिकेचे भाजपचे उपनगराध्यक्ष सीताराम म्यानेवार यांच्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल
Crime
Crimesakal media

वसमत (जि.हिंगोली) : वसमत नगरपालिकेचे भाजपचे (BJP) उपनगराध्यक्ष सीताराम म्यानेवार यांच्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात बुधवारी (ता.आठ) विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. येथील एका महिलेने बुधवारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये उपनगराध्यक्ष सिताराम गणपत म्यानेवार यांनी ३ जानेवारी २०२० रोजी सकाळी घरातील दुकानात प्रवेश करून विनयभंग करुन या प्रकरणात साक्षीदारास शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे तक्रारीत (Hingoli) नमुद करण्यात आले आहे. यावरून पोलिसांनी सिताराम म्यानेवार यांच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, पोलिस उपनिरीक्षक प्रतिभा शेटे करित आहेत. या संदर्भात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिवदास बोड्डेवार यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. (Vasmat Municipal Council)

Crime
Chitra Wagh|शिवीगाळ प्रकरणी संजय राऊतांवर कारवाई करा : चित्रा वाघ

यावेळी बोड्डेवार यांनी हा राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर गुन्हा दाखल करून आमचे उपनगराध्यक्ष म्यानेवार यांची प्रतिमा मलीन करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी पोलिस अधीक्षक यांना भेटून निवेदन देणार आहोत. यावेळी पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्ष सिताराम म्यानेवार, नगरसेवक शिवाजी अडलिंगे, विष्णु बोचकरी, गणेश काळे, भगवान कुदाळे, भारत स्वामी , अॅड. रंगनाथ देशमुखे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com