पाण्यासाठी मोजावे लागताहेत पैसे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

बीड - उन्हाचा पारा चढू लागला असून सध्या शहरातील तापमान ४२ अंशाच्या पुढे जाऊ लागले आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिक शहरात कामासाठी येतात; परंतु तहान लागते तेव्हा शहरात कुठेही मोफत पाणी मिळत नाही. यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन शहरात पाणपोया सुरू करण्याची गरज आहे.

ग्रामीण भागातून शहरात कामासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त आहे; मात्र ज्यावेळेस हे ग्रामस्थ शहरात येतात, त्यावेळेस त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहे. गेल्या वर्षी शहरात अनेक पाणपोया सुरू होत्या. त्या तुलनेत यावर्षी शहरात फक्त दोन ते तीन पाणपोया सुरू झाल्या आहेत. शहरामध्ये अनेक सामाजिक संघटना चांगले काम करीत आहेत. त्यांनी जर शहरात पाणपोयांची सोय केली तर अनेकांना त्यांचा फायदा होईल. 

बसस्थानकातील पाण्याचा प्रश्‍न कायम
येथील जिल्हा बसस्थानकामध्ये गेल्या तीन वर्षांपासून येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न आहे. यासाठी अनेक वेळा येथील अधिकाऱ्यांना निवेदनेही देण्यात आली; मात्र येथील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे येथील पाण्याचा प्रश्‍न कायम आहे. यामुळे येथील प्रवाशांना एक लिटर पाण्यासाठी वीस रुपये मोजावे लागत आहेत.

Web Title: Money pay for water in beed