औरंगाबाद: सोयगावात माकडाच्या टोळ्यांचा गावभर धिंगाणा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

या टोळ्यांच्यामध्ये काही पिसाळलेली माकडे असल्याने ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे वनविभागाचे पथक अद्यापही घटनास्थळी दाखल झालेले नाही.

सोयगाव : तालुक्यातील जरडी येथे रविवारी पहाटे माकडाच्या टोळ्यांनी गावभर धिंगाणा घालुन रस्त्याने पायी चालणारी व्यक्तींवर हल्ले चढविण्याचे प्रयत्न करुन गावभर दहशत पसरविल्याने गावात काहीवेळ शुकशुकाट पसरला होता.

दरम्यान २०० माकड गावात अचानक शिरल्याने गोंधळ उडाला होता. गावातून या माकडाच्या टोळ्याना बाहेर पिटाळण्यासाठी पुढे आलेल्या ग्रामस्थांवर हल्ले चढवून दहशत पसरविल्याने ग्रामस्थ चिंतेत होते. दरम्यान या माकडाच्या टोळीने गावात काही घरांच्या छताचा ताबा घेतला होता. दरम्यान अजिंठ्याच्या डोंगराळ भागातील सततच्या पावसामुळे कंटाळून माकडे गावाकडे आली आहे.

या टोळ्यांच्यामध्ये काही पिसाळलेली माकडे असल्याने ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे वनविभागाचे पथक अद्यापही घटनास्थळी दाखल झालेले नाही.

Web Title: monkeys in Aurangabad

टॅग्स