

Mothers Struggle Inspires Son to Become Forest Officer From Waste Picking Days to IIT Madras and UPSC Rank 139
esakal
सातारा : मुंबईच्या झोपडपट्टीत कचरा वेचून मुलांना शिकवणाऱ्या आईच्या कष्टांना अखेर यशाची सलामी मिळाली. जालना येथील गौतम यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत JEE उत्तीर्ण होऊन IIT Madrasमध्ये प्रवेश मिळवला. त्यानंतर UPSC Indian Forest Service Examinationमध्ये देशात १३९ वा क्रमांक मिळवत आज ते Kanger Valley National Parkचे संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या या यशामागे मात्र त्यांच्या आई सखुबाई पाडीभार यांचा संघर्ष दडलेला आहे.