मुलाच्या आत्महत्येच्या धक्क्याने आईचीही आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

मुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना निलंगा लालुक्यातील निटूर गावात घडली. 

लातूर : मुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना निलंगा लालुक्यातील निटूर गावात घडली. 

निटूर येथील नितीन सुभाष घोडके (30) याने दुपारी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती त्याची आई आशाबाई सुभाष घोडके (50) यांना सायंकाळच्या सुमारास कळली. त्यावेळी आशाबाई शेतात काम करत होत्या. मुलाच्या आत्महत्येची बातमीने मोठा धक्का बसल्याने त्यांनी शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, या घटनेने निलंगा तालुक्यात खळबळ उडाली असून, सुभाषच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Web Title: Mother Committed Suicide After Son Suicide in Latur