धक्कादायक ! तलाठ्याला फेकले नदीपात्रात  

कृष्णा पिंगळे
Tuesday, 28 April 2020

संपूर्ण प्रशासन कोरोनाच्या विरुद्ध लढण्यात मग्न असतांना सोनपेठ तालुक्यात वाळू चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. वाळू चोरांवर कुठलीच कारवाई या दरम्यान न झाल्याने वाळू चोरांचे मनोधैर्य वाढले असल्यामुळेच हा गंभीर प्रकार घडला आहे. वाळू चोरीस प्रतिबंध करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच जीवघेणा प्रसंग ओढवल्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचत आहे.

सोनपेठ (जि.परभणी) : अवैध वाळू उत्खननास विरोध करणाऱ्या तलाठ्यास वाळूचोरांनी नदीपात्रात फेकल्याची घटना मंगळवारी (ता. २८) शिर्शी (ता.सोनपेठ,जि.परभणी) येथे घडली आहे.
 शिर्शी (ता.सोनपेठ,जि.परभणी) येथे गोदावरी नदीपात्रात लॉकडाउन व संचारबंदी कायम असतानाही काहीजण होडीने वाळू उपसा करत असल्याची माहिती शिर्शी सज्जाचे तलाठी सोमनाथ एकलिंगे यांना मिळाली. त्यामुळे मंगळवारी (ता. २८)  शिर्शी येथे गेले असता त्यांना नदीपात्रात प्रकाश पंडुरे, विकास पंडुरे, माणिक पंडुरे हे तिघेजण होडीच्या साहाय्याने वाळू उपसून काढत असल्याचे आढळून आले.  तलाठ्याने या बाबत प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला असता तलाठी एकलिंगे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून तसेच धक्काबुक्की करून लगतच्या गोदावरी नदीपात्रात फेकून दिले. सोबत उपस्थित असणाऱ्या उपसरपंच बापूराव सोळंके व कोतवाल शेवनाथ शिंदे यांनी तलाठी एकलिंगे यांना तत्काळ बाहेर काढले.

 हेही वाचा -महाराष्ट्रासाठी अशोक चव्हाण यांनी गडकरींकडे काय मागितले....वाचा...

पोलिसांनी घेतले आरोपींना ताब्यात
तलाठी एकलिंगे यांनी सायंकाळी सोनपेठ पोलिस ठाण्यात येऊन त्या तिघांविरुद्ध वाळू चोरी, शासकीय कामात अडथळा आणणे, जमाव गोळा करून दबाव आणण्याचा प्रयत्न करणे, संचारबंदीमध्ये जमाव गोळा करणे या बाबत फिर्याद दिली आहे. सोनपेठ पोलिसांनी त्या तिघांविरुद्ध विविध कलमाखाली गंभीर गुन्हे दाखल केले असून आरोपींना ताब्यात घेतले आहे. 

हेही वाचा - ४६ हजार शेतकऱ्यांची नोंदणी; कापूस खरेदी प्रक्रिया सुरू

कर्मचाऱ्यांवरच जीवघेणा प्रसंग
संपूर्ण प्रशासन कोरोनाच्या विरुद्ध लढण्यात मग्न असतांना सोनपेठ तालुक्यात वाळू चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. वाळू चोरांवर कुठलीच कारवाई या दरम्यान न झाल्याने वाळू चोरांचे मनोधैर्य वाढले असल्यामुळेच हा गंभीर प्रकार घडला आहे. वाळू चोरीस प्रतिबंध करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच जीवघेणा प्रसंग ओढवल्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचत आहे. या वाळू चोरांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. सोनपेठ तालुक्यातील संपूर्ण प्रशासन हे कोरोनाच्या जीवघेण्या आजारासोबत जीवाची बाजी लावून लढत असतांना अवैध धंदे करणारे मात्र, या संकटाकडे संधी म्हणून पाहत आहेत. या संकट काळात आपल्या अवैध धंद्यावर कोणाचे लक्ष जाणार नसल्याने वाळू तस्कर दिवसरात्र गोदावरी नदीतून वाळू चोरी करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The sand thieves pushed the lake into the river basin,parbhani news