भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

नांदेड: नांदेड- हैद्राबाद मार्गावरील वाका फाटा (ता. लोेहा) अज्ञात कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता.14) घडली. गतिरोधका अभावी याच ठिकाणी ओनक वेळा गंभीर अपघात होत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी घटने नंतर गतिरोधकाच्या मागणीसाठी नांदेड- हैद्राबाद मार्गावरील घटनास्थळावर चार तास रास्ता रोको आंदेालन केल्याने जिल्हा प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान रास्ता रोकोमुळे महामार्गावर जवळपास पाच किलोमिटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.

सोमठान (ता. लोहा) येथील विश्वनाथ कवळे व माधव गुंठै हे दोघे साेमवारी नांदेड- हैद्राबाद महामार्गाने मोटारसायकल क्रमांक एम. एच. 26 1519 वरुन नांदेडकडे जात असताना वाका फाटा येथे अज्ञात भरधाव कंटेनरने मोटारसायकस्वारांना जोराची धडक दिली. हा अपघात एवढा भिषन होता की मोटारसायकल चालक विश्‍वनाथ कवळे वय (42 वर्षे) यांचा जागेवर मृत्यू झाला. माधव गुंठे वय (30 वर्षे) हा गंभीर जखमी झाला. अपघातानंतर काही वेळात नागरीकांनी घटनास्थळाकडे धाव घेवून जखमींना उपचारार्थ नांदेडच्या शासकिय रुग्नालयात दाखल करण्यात आले.

गतिरोधका अभावी भरधाव सुटणाऱ्या वाहनामुळे याच ठिकाणी ओनक अपघात होत असल्याने परिसरातील नागरीकांची कित्तेक दिवसापासून गतिरोधकची मागणी आहे. वारंवार मागणी करूनही दूर्लक्ष होत असल्याने जबाबदार प्रशासनास आनखी किती जीव घ्यायचे हा संतप्त सवाल उपस्थित करत संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळावरच रास्ता रोको आंदोलन सुरू केल्याने नांदेड- हैद्राबाद मार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती. मागणीवर ठाम आंदोलनकर्ता जमाव शांत करण्यात उस्माणनगर, कुंटूर पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. वेळीच कंन्स्ट्रक्शन व्यवस्थापकाने आंदोलनस्थळी भेट देवून प्रत्यक्ष कामाचे अश्‍वासन दिल्याने आंदाेलन स्थगित करण्यात आले. घटने नंतर संतप्त जमावाने नांदेड- हैद्राबाद महामार्गा चार तास रोखुन धरल्याने जवळपास पाच किलोमिटर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com