दुचाकी चोराला अटक, पाच दुचाकी जप्त

दुचाकी चोराला अटक, पाच दुचाकी जप्त

परभणी : परभणी शहरातून मोटारसायकल चोरणाऱ्या एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बांदरवाडा (ता.पाथरी) येथून गुरुवारी (ता.27) ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या पाच मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

परभणी रेल्वे स्टेशनसह शहरातील काही भागातून गेल्या काही दिवसापासून मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने गुरुवारी बांदरवाडा (ता.पाथरी) येथील गणेश काशीनाथ गायकवाड हा इसम गाड्या चोरी करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी बांदरवाडा येथून गणेश गायकवाड यास गुरुवारी ताब्यात घेतले. त्याच्या घरातून होंडा कंपनीच्या दोन सीबी शाईन मोटार सायकल, हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्रो व स्प्लेंडर प्लस अशा दोन मोटार सायकल जप्त केल्या.

अधिक चौकशीमध्ये अजून एक मोटार सायकल मेकॅनिककडे दुरुस्तीला टाकळी असल्याचे ही त्याने कबुल केले. एकूण 1 लाख 4 हजार रुपये किमंतीच्या मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुनील गोपीनवार, पोलिस कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, अरूण पांचाळ, सय्यद मोबीन, जमीर फारोकी, शंकर गायकवाड यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com