Latur Accident
sakal
मराठवाडा
Latur Accident: वडिलांना भेटण्यासाठी जाणाऱ्या युवकाचा अपघातामध्ये मृत्यू; निलंगा औसा रोडवर एसटीची दुचाकीला धडक
Accident News: निलंगा-औसा रस्त्यावर भरधाव एसटी बसने दुचाकीस्वार हबीब शेख यांना जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतक मागे पत्नी, तीन मुली, आई-वडील आणि बहीण आहे.
निलंगा : भरधाव एसटी बसने दुचाकीस्वारास जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना निलंगा-औसा रोडवरील निंबाळकर पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी (ता. १८) सकाळी ११.५५ वाजता घडली. हबीब हसन शेख (वय ३२, रा. शेडोळ, ता. निलंगा) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

