'पैसे आमच्या हक्काचे नाहीत कोणाच्या बापाचे; आधी पैसे नंतरच मतदान'

'पैसे आमच्या हक्काचे नाहीत कोणाच्या बापाचे; आधी पैसे नंतरच मतदान'

बीड : पैसे आमच्या हक्काचे नाहीत कोणाच्या बापाचे, अगोदर पैसे नंतरच मतदान अशा घोषणांचा गजर आणि ‘पहले भुगतान फिर मतदान’ असा मजकूर लिहलेल्या टोप्या घालून लेकुरवाळ्या महिला, वृद्धा आणि पुरुषांचा मोर्चा सोमवारी (ता. 26) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. विविध कंपन्यांतील गुंतवणूकदार आणि एजंटांच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणानून गेला होता.
 
पर्ल्स, साईप्रसाद, समृद्ध जिवन, मैत्रेय, ट्विंकल, एचबीएन डेअरी, गरिम, एनआयीएल, सनशाईन, पॅन कार्ड क्लबमध्ये जिल्ह्यातील हजारो एजंटांच्या माध्यमातून लाखो सामान्य गुंतवणूकदारांनी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र, अनेक अमिषे दाखवून गुंतवणूक करुन घेऊन फसवणूक झाल्याचे आता उघड झाले आहे.

गुंतवणूकदार एजंटांचे उंबरे झिजवत आहेत. तर, गुंतवणूकदारांच्या धास्तीने अनेक एजंटांना आपले गाव सोडावे लागले आहे. पैसे परत मिळावेत यासाठी एजंटांनी विविध मार्गांनी आंदोलने, पाठपुरावे करुनही शासन दखल घेत नाही. गुंतवणूकदारांमध्ये शेतकरी, मजूरांचा समावेश असून लाखो रुपयांची गुंतवणूक केल्याने पाल्यांच्या शिक्षणात अडचणी येत असून अनेकांच्या मुलींचे लग्नही राहीले आहे.

गुंतवणूकदार व एजंटांमध्ये भांडणाचे प्रकार नित्याचे झाले आहेत. मात्र, शासन याबाबत कुठलीही ठोस भूमिका घेत नसल्याने सोमवारी मोर्चा निघाला. सकाळी अकरा नंतर गुंतवणूकदार आणि एजंट येथील जिल्हा क्रीडा संकुलात जमले. त्यानंतर मोर्चाला सुरुवात होऊन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

‘पहले भुगतान फिर मतदान’ असा मजकूर लिहलेल्या टोप्या घालून गुंतवणूकदार व एजंट मोर्चात सहभागी झाले. याच आशयाचे फलक हाती घेतलेल्या वृद्ध महिला, युवती आणि लेकुरवाळ्या महिलांचाही मोठा सहभाग होता. मोर्चाचा रस्ता आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसर घोषणांनी दणानुन गेला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com