अनुदानासाठी तळ्यात आंदोलन

एकनाथ तिडके
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

माळाकोळी : परतीच्या बेमोसमी पावसामुळे माळाकोळी (ता.लोहा) व परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थीक अडचणीत सापडला आहे. यामुळे कसल्याही अटी शर्थी शिवाय तसेच सोपस्काराशिवाय तातडीने आर्थीक मदत देण्यात यावी व अन्य मागण्यांसाठी माळाकोळी येथील शेतकऱ्यांनी सार्वजनिक तलावात उतरुन आंदोलन केले.

माळाकोळी : परतीच्या बेमोसमी पावसामुळे माळाकोळी (ता.लोहा) व परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थीक अडचणीत सापडला आहे. यामुळे कसल्याही अटी शर्थी शिवाय तसेच सोपस्काराशिवाय तातडीने आर्थीक मदत देण्यात यावी व अन्य मागण्यांसाठी माळाकोळी येथील शेतकऱ्यांनी सार्वजनिक तलावात उतरुन आंदोलन केले.

या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
परतीच्या पाऊसाने माळाकोळी भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सतत चार वर्षाचा दुष्काळ व यावर्षीची अतिवृष्टी या मुळे या भागातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. या मुळे कुठल्याही अटी शर्थी व सोपस्काराशिवाय तातडीने शेतकऱ्यांना आर्थीक मदत होणे गरजेचे आहे. म्हणून तातडीने हेक्टरी ७५ हजार मदत देण्यात यावी, खरीप हंगाम २०१८ चा पिकविमा व जाहीर केलेले दुष्काळ अनुदान देण्यात यावे, खरीप हंगाम २०१९ चा पिकविमा मंजुर करण्यात यावा या मागण्यांसाठी शुक्रवारी (ता.आठ) नोव्हेंबर रोजी माऊली गिते यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी सार्वजनिक तलावात उतरुन जलसमाधी आंदोलन केले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी तलावात उतरुन घोषणा दिल्या. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक श्री घाटे यांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. व तात्पुरत्या बोटींच्या सहाय्याने जीवरक्षक जवानही तैनात केले होते. 

पाठपुरावा सुरू

या वेळी तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी नुकसान भरपाईसाठी ८० टक्के पंचनामे झाले असून तातडीने मदत करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. ईतरही मागण्यांसदर्भात लवकरच योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन तहसीलदार यांच्या वतीने मंडळ अधिकारी श्री भोसीकर व तलाठी श्री संदीप फड यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार यांच्या आवाहनानंतर सदर आंदोलन एक महिनाभराकरीता स्थगित केले.

तर पुन्हा आंदोलन

या वेळी माऊली गिते म्हणाले,  मागील दुष्काळ व आताची अतिवृष्टी यामुळे शेतकरी आर्थीक अडचणीत आहे त्यामुळे नियम, निकष व कागदी घोडे नाचवण्यापेक्षा तातडीने मदत करावी यासाठी आम्ही जलसमाधी आंदोलन केले मात्र प्रशासनाच्या आवाहनानुसार सदर आंदोलन महिनाभराकरीता स्थगित केले आहे, मात्र महिनाभरात मागण्या पुर्ण झाल्या नाहीत तर पुन्हा आंदोलन करणार आहे. 

...यांच्यासह शेतकरी उपस्थीत

या वेळी माऊली गिते, भिमराव केंद्रे, रामेश्वर महाराज केंद्रे, लक्ष्मन तिडके, सचिन पवार, कैलास फुलारी,  काशीनाथ बादवाड, सिद्धार्थ ढवळे, रघुनाथ मोरे, नामदेव कारेगावकर, राजु केंद्रे, माजी सरपंच केशव मस्के, एकनाथ केंद्रे, मारोती कांबळे, श्री साबळे, बालाजी मुस्तापुरे यांच्यासह शेतकरी उपस्थीत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movement in the pond for grants