
या वेळी आढावा घेताना खा. पाटील यांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणे सुरळीत होऊन शेतकऱ्यांची गैरसोय टाळावी, यासाठी बँकांना महत्वपूर्ण सूचना केल्या.
बँकांनो, शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करा : खासदार पाटील
हिंगोली : जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांचा (Nationalized Bank) शेतकऱ्यांना होणारा पिक कर्ज पुरवठा (Crop loan supply) तीन वर्षात अत्यंत कमी आहे. देशातील सर्वात मोठ्या बँकेसाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करा अन्यथा तुमची खैर नाही अशी ताकीद खासदार हेमंतभाऊ पाटील (MP hemant patil) यांना बँक अधिकाऱ्यांना दिली. (MP hemant patil said that banks in hingoli district should fulfill the objective of allocating crop loans to farmers)
हेही वाचा: शिवणी येथे मुसळधार पाऊस ! पावसाच्या सरी ओलावले शेतशिवारात
शनिवारी (ता.२९) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणाऱ्या पीक कर्ज वाटप संदर्भात राष्ट्रीयकृत बँकाना येणाऱ्या अडचणी बाबत घेण्यात येणाऱ्या आढावा बैठकीत खासदार हेमंत पाटील बोलत होते. या बैठकीस हिंगोली जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक शशिकांत सावंत यांच्यासह बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हेही वाचा: हिंगोली जिल्ह्यात हिवताप, डेंग्यु आजाराचे सर्वेक्षण
या वेळी आढावा घेताना खा. पाटील यांनी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणे सुरळीत होऊन शेतकऱ्यांची गैरसोय टाळावी, यासाठी बँकांना महत्वपूर्ण सूचना केल्या. बँकेचे अधिकारी लोकप्रतिनिधींचे फोन उचलत नाहीत तसेच शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत, याबद्दल नाराजी व्यक्त करीत हे पुन्हा होऊ देऊ नका, अशी स्पष्ट ताकीद दिली.
हेही वाचा: हिंगोली : पानकनेरगाव येथे लवकरच उपबाजारपेठ सुरु होणार
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप संदर्भात येणाऱ्या अडचणींचे निराकरण त्वरीत करण्यासाठी प्रत्येक तहसिल कार्यालयात तक्रार निवारण कक्ष तयार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा जास्तीत जास्त होण्यासाठी लाईन ऑफ अँक्शन ठरवून प्रत्येक बँकेने आठ दिवसांचे शेड्यूल येत्या दोन दिवसात द्यावे अशा सूचनाही केल्या.हिंगोली
हेही वाचा: भाजप हिंगोली जिल्ह्यातील १५० गावात कोरोनासंबंधी करणार सेवाकार्य- ॲड. शिवाजी जाधव
बँकेकडे असलेल्या दत्तक गावांची यादी तयार करून ती वर्तमानपत्रात प्रकाशित करावी, जेणेकरून शेतकऱ्यांची गैरसोय टाळली जाईल, बँक प्रशासनाने ग्रामपंचायत स्तरावर शिबिरे आयोजित करावी. त्यामुळे बँकांतील अनावश्यक गर्दी कमी होऊन शेतकऱ्यांच्या वेळेची व पैशाची बचत होईल.
(MP hemant patil said that banks in hingoli district should fulfill the objective of allocating crop loans to farmers)
Web Title: Mp Hemant Patil Said That Banks In Hingoli District Should Fulfill The Objective Of Allocating Crop Loans To
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..