खासदार ओमराजे निंबाळकरांवर हल्ला करणारा अटकेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

एका शेतामध्ये अजिंक्य लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यास शोधुन काढत पोलिस ठाण्यात हजर केले. रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान त्याला अटक केल्याची माहिती पोलीस अधिक्षक राज तिलक राैशन यांनी दिली.

उस्मानाबाद : खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर चाकुहल्ला करणाऱ्या अजिंक्य टेकाळे याला पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली.

एका शेतामध्ये अजिंक्य लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यास शोधुन काढत पोलिस ठाण्यात हजर केले. रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान त्याला अटक केल्याची माहिती पोलीस अधिक्षक राज तिलक राैशन यांनी दिली.

पोलिस त्याच्याकडून माहिती घेत आहेत. मानसिकदृष्ट्या त्यांच्यामध्ये दोष असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, अंधारातील एक व्हिडिओ व्हायरल होत असुन त्याने केलेल्या प्रकाराचे अजिंक्य कारण सांगत असल्याचे दिसत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Omraje Nimbalkar attacker Ajinkya Tekale arrested in Osmanabad