दुष्काळाचे राजकारण करणाऱ्या सरकारला उलथवून टाका : डॉ. राजीव सातव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

हिंगोली : दुष्काळाचे राजकारण करणाऱ्या केंद्र व राज्‍यातील भाजप सरकारला उलथवून टाका असे आवाहन खासदार डॉ. राजीव सातव यांनी सोमवारी (ता.12) औंढा येथील जिंतूर टी पॉईंट येथे रास्‍तारोको आंदोलनात केले आहे.

हिंगोली : दुष्काळाचे राजकारण करणाऱ्या केंद्र व राज्‍यातील भाजप सरकारला उलथवून टाका असे आवाहन खासदार डॉ. राजीव सातव यांनी सोमवारी (ता.12) औंढा येथील जिंतूर टी पॉईंट येथे रास्‍तारोको आंदोलनात केले आहे.

औंढा नागनाथ येथील जिंतूर टी पाँईंट येथे काँग्रेस व राष्ट्रवादीतर्फे वसमत व औंढा तालुका दुष्काळग्रस्‍त जाहिर करावा या मागणीसाठी रास्‍तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार सातव यांच्‍यासह काँग्रेसचे जिल्‍हाध्यक्ष संजय बोंढारे, राष्ट्रवादीचे जिल्‍हाध्यक्ष मुनीर पटेल, राजू नवघरे, बाजार समितीचे संचालक डॉ. गयबाराव नाईक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय दराडे, अब्‍दूल हाफिज अब्‍दूल रहेमान, कृषी सभापती प्रल्‍हाद राखोंडे, जिल्‍हा परिषद सदस्य भगवान खंदारे, डॉ. सतीश पाचपुते, कैलास साळुंके, हिंगोलीचे माजी उपनगराध्यक्ष बापूराव बांगर, बापूराव घोंगडे, केशव नाईक, प्रमोद देशपांडे आदी उपस्‍थित होते. या आंदोलनामुळे औंढा नागनाथ येथून जिंतूर, परभणी व नांदेडकडे जाणारी वाहतूक सुमारे तीन तास ठप्‍प झाली होती.

यावेळी बोलताना खासदार सातव म्‍हणाले, केंद्र व राज्‍य शासनाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केली आहे. दुष्काळ जाहिर करण्यामध्ये शासनाकडून राजकारण केले जात असल्‍याचा आरोप त्‍यांनी केला. केंद्र व राज्‍यातील भाजप सरकार सर्वसामान्य व शेतकऱ्यांच्‍या हिताचे नसून उद्योगपतींच्‍या हिताचे असल्‍याचा आरोप त्‍यांनी केला आहे. या सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्‍या आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्‍यामुळे राज्‍यातील सरकारची फसवी कामगिरी असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. त्‍यामुळे आगामी निवडणुकीत या सरकारला उलथवून टाका असे आवाहन त्‍यांनी यावेळी केली. यावेळी पटेल, बोंढारे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्‍थित होते.

Web Title: MP Rajeev satav criticize bjp government about drought