'प्रकाशगड' ला घेराव घालणार - खासदार संजय जाधव

'प्रकाशगड' ला घेराव घालणार - खासदार संजय जाधव

परभणी- जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शिवारात सध्या पाणी बऱ्यापैकी पाणी उपलब्ध आहे. परंतू विज नसल्याने पिकांना पाणी देणे आवघड झाले आहे. अश्या परिस्थितीत दुरुस्ती अभावी बंद असलेल्या रोहित्राच्या दुरुस्तीसाठी महावितरण चालढकल करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने तोडगा न काढल्यास खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी महावितरणच्या मुंबई येथील प्रकाशगड कार्यालयास घेराव घालणार आहेत.

परभणी जिल्ह्या दुष्काळी परिस्थितीत आहे. सततच्या दुष्काळामुळे या जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या सारख्या गोष्टीकडे वळत आहे. एकी नापिक व दुसरीकडे पाणी असतांनाही शेत शिवारातील पिके पाण्याअभावी करपत आहेत.अशी विदारक स्थिती सध्या निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची खरी अडचण त्यांच्या शेतातील ना दुरुस्त रोहित्र आहेत. सध्या 250 नादुरुस्त रोहित्राची प्रतिक्ष यादी आहे. असे असतानाही ही प्रतिक्षा यादी तात्काळ कमी करण्यासाठी महावितरण कोणतेही पावले उचलतांना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

दररोज हजारो शेतकरी खासदार संजय जाधव यांची भेट घेवून रोहित्राचे गाऱ्हाणे मांडत आहेत. या आगोदरही खासदार संजय जाधव यांनी याच प्रश्नावर महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून जाब विचारला होता. आता परत तीच समस्या उदभवल्याने महावितरणच्या या भोंगळ कारभाराला चव्हाट्यावर आणण्यासाठी जिल्ह्यातील हजारो शेतकरी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे धडकणार आहेत. ता, 7 डिसेंबर महावितरणला डेडलाईन देण्यात आली आहे. तो पर्यत सर्व रोहित्राची दुरुस्ती करून ती शिवारात बसवावीत अन्यथा ता. 7 डिसेंबर रोजी हजारो शेतकरी मुंबई येथील प्रकाशगड कार्यालयास घेराव घालणाच्या मानसिकतेत आहेत.

महावितरणचे वेळीच जागे व्हावे - खासदार जाधव
महावितरणचा कारभार अत्यंत खराब झाला आहे. सर्वसामान्य नागरीक, शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम महावितरणचे अधिकारी करत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे रोहित्र तात्काळ दुरुस्त करून न दिल्यास (ता. 7) डिसेंबर रोजी मी हजारो शेतकऱ्यांसोबत महावितरणच्या कार्यालयावर जाईल. त्या परिणामास महावितरण जबाबदार असेल असा इशारा खासदार संजय जाधव यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com