
MPSC Aspirants Demand Postponement of Prelims as Floods Destroy Study Material in Marathwada
Esakal
गेल्या आठवड्याभरात मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने तडाखा दिला. दुष्काळी जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यानं प्रचंड नुकसान झालं. अनेक गावं पुराच्या विळख्यात आहेत. पुरामुळे पीक पाण्याखाली गेलंय, घरांमध्ये पाणी शिरलंय, जनावरं वाहून गेल्यात. आस्मानी संकटात मराठवाड्यातील शेतकरी सापडले आहेत. अशा परिस्थितीत एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे येत्या २८ सप्टेंबरला होणारी राज्यसेवेची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी राष्ट्रावादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय.