जायकवाडी धरण असताना दोनशे टॅंकर सुरू - अमोल कोल्हे

अमाेल काेल्हे
अमाेल काेल्हे

पैठण (जि.औरंगाबाद) : ""जायकवाडी धरणामुळे समृद्ध वाटणाऱ्या पैठण तालुक्‍यातील जनतेला सध्या दोनशे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मते मागायला येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना याविषयी विचारा,'' असा उपरोधिक टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी (ता. 16) लगावला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार दत्ता गोर्डे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत डॉ. कोल्हे म्हणाले, ""राम मंदिर, कलम 370 चा मुद्दा निवडणुकीशी काही संबध नसताना पुढे करण्यात आला. राममंदिर व्हावे, हे सर्वांनाच वाटते; परंतु हे मंदिर उभारून तुमचे प्रश्न सुटणार आहेत का? तुमच्या हाताला काम मिळून सुखाचा घास खाता येईल का? विविध निकषांआधारे कर्जमाफीची घोषणा करून अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे केले गेले.

जनतेच्या प्रश्नांसाठी मंत्रिपदाचे राजीनामे देण्याची भाषा शिवसेना पाच वर्षे करीत आली; परंतु एकदाही त्यांचा राजीनामा खिशातून बाहेर आला नाही. आता दहा रुपयांत थाळी देण्याचे आश्‍वासन ते देत आहेत. द्यायचा तर हक्काचा रोजगार द्या.'' पैठण एमआयडीसीतील बंद उद्योगधंदे, ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या प्रलंबित कामांचा त्यांनी समाचार घेतला.

सरसकट कर्जमाफी, हक्काच्या रोजगारासाठी "राष्ट्रवादी'ला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी मंत्री अनिल पटेल, आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार चंद्रकांत घोडके, "राष्ट्रवादी'चे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब निर्मळ, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद तांबे, माजी नगराध्यक्ष अनिल घोडके, रामनाथ चोरमले, महंमद हानिफ यांची प्रमुख उपस्थिती होती. दत्ता गोर्डे यांनी प्रास्ताविकात तालुक्‍याचा विकास करण्यासाठी निवडणूक लढवीत असल्याचे सांगितले.

डॉ. अमोल कोल्हे यांचा "रोड शो'
सभेपूर्वी डॉ. अमोल कोल्हे यांच्या रोड शोमुळे मतदार, कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शरद पवार जिंदाबाद, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विजय असो आदी घोषणांनी शहर दणाणले. रोड शोमध्ये महिलांची गर्दी लक्षणीय होती. डॉ. कोल्हे यांना पाहण्यासाठी, मोबाईल कॅमेऱ्यात त्यांचे फोटो काढण्यासाठी तरुणाईची गर्दी होती. यावेळी उमेदवार दत्ता गोर्डे यांच्यासह अनिल पटेल, सतीश चव्हाण, भास्कर राऊत, अनिल घोडके, डॉ. गुलदाद पठाण, अप्पासाहेब गायकवाड, भाऊसाहेब पिसे, अप्पासाहेब निर्मळ आदी सहभागी झाले होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com