केज मतदार संघात मुंदडा - सोनवणेंत अखेर मनोमिलन

केज मतदार संघात मुंदडा - सोनवणेंत अखेर मनोमिलन

अंबाजोगाई : झालेल्या चुका विसरून आगामी विधानसभेला राष्ट्रवादीकडून केजच्या उमेदवार नमिता मुंदडाच असणार असा शब्द विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी दिल्यानंतर या मुंदडा - सोनवणे गटाचे अखेर रविवारी (ता. २४) मनोमिलन झाले.

राष्ट्रवादीकडून नमिता मुंदडा यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरही सोनवणे गटाकडून मुंदडांचे खच्चीकरण केले जात असल्याचा समर्थकांचा आरोप होता. त्यामुळे या नाराजीच्या कारणाने लोकसभा निवडणुक प्रचारापासून मुंदडा गट अलिप्त होता. मधल्या काळात झालेल्या बुथ प्रमुखांच्या मेळाव्यालाही नंदकिशोर मुंदडा आणि अक्षय मुंदडा यांनी पाठ फिरविली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या होमपिचपवरील पक्षातील ही गटबाजी राजकीय चर्चेचा मुद्दा झाला हेाता. 
या पार्श्वभूमीवर शनिवारी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्यात शनिवारी (ता. २३) बैठक होऊन चर्चा झाली. त्यानंतर रविवारी अक्षय मुंदडा यांच्या आई निवासस्थानी मुंदडा समर्थकांची बैठक झाली. तत्पुर्वी नंदकिशोर मुंदडा व बजरंग सोनवणे यांच्यातही बैठक झाली.  मुंडे आणि मुंदडा यांच्यासह उमेदवार बजरंग सोनवणे, अक्षय मुंदडा व नमिता मुंदडा उपस्थित होत्या. यावेळी पक्षांतर्गत विरोधकांकडून होणाऱ्या खच्चीकरणाचे गाऱ्हाणे मुंदडा समर्थकांनी मांडले. त्यावर मागील विधानसभा निवडणुकीत झालेल्या चुका पुढे होणार नाहीत. आगामी विधानसभेत नमिता मुंदाच उमेदवार असतील असा शब्द  मुंडे व सोनवणे यांनी दिला. त्यानंतर मनोमिलन झाल्याचा निर्णय दोन्ही बाजूंनी जाहीर करण्यात आला.

पदाधिकारी निवडीचे अधिकारी मुंदडांना 
दरम्यान, केज मतदार संघातील केज व अंबाजोगाई तालुक्याच्या पक्षसंघटनेवर पदाधिकारी निवडताना मुंदडांना डावलले होते. हा मुद्दाही नंतर पक्षपातळीवर गेल्यानंतर दोन्ही तालुक्यांच्या पदाधिकारी निवडीचे अधिकार मुंदडांना देण्याच्या सुचना दिल्यानंतरही याकडेही कानाडोळा केल्याने नाराजी होती. आजच्या मनोमिलनानंतर दोन्ही तालुक्यांचे पदाधिकारी आता मुंदडा निवडणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com