लातूरमध्ये 850, तर परभणीत 960 अर्ज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

लातूर, परभणी - लातूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी 850, तर परभणी महापालिकेसाठी 960 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी, सोमवारी (ता. 3) हे चित्र स्पष्ट झाले. येत्या सात एप्रिलला उमेदवारी अर्ज माघारीची मुदत असून त्या वेळी लढतींचे स्वरूप कळेल. 19 एप्रिलला मतदान, तर 21 एप्रिलला मतमोजणी होईल.

लातूरला आज 643 उमेदवारी अर्ज दाखल झाले. आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण अर्जांची संख्या 850 झाली आहे. 27 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. आरंभीचे दोन दिवस उमेदवारी अर्ज आले नाहीत. 30 मार्चला एकमेव अर्ज आला. 31 मार्चला 19, एक एप्रिलला 65, दोन एप्रिलला 122 अर्ज दाखल झाले होते. इच्छुक उमेदवारांना प्रथम ऑनलाईन अर्ज भरून प्रिंट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करावे लागले. आज ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळ लागला. राजकीय पक्षांकडून एबी फॉर्म मिळविण्यासाठी उमेदवारांची दिवसभर धडपड सुरू होती. भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना व परिवर्तन आघाडी पक्षाच्या उमेदवारांनी दुपारी तीनपूर्वी एबी फॉर्म दाखल केले. सोमवारी शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार, त्यांचे समर्थक व कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. दरम्यान परभणीत 65 जागांसाठी 960 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

Web Title: municipal election latur & parbhani