महापालिका निवडणुक : बुधवारी आरक्षण सोडत

माधव इतबारे
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना प्रभागरचना तयार करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या निवडणूक विभागाने प्रभागरचनेचा आराखडा तयार करून तो जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सादर केला होता. विभागीय आयुक्तांनी तो आयोगाकडे सादर केला.

औरंगाबाद-महापालिकेच्या आगामी निवडणुका प्रभागरचनेनुसारच होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचनेला मंजुरी दिली असून, बुधवारी (ता.18) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आरक्षण सोडत काढली आहे. त्यानंतर 20 डिसेंबरला प्रारूप प्रभागरचनेची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे. हरकती, आक्षेपसाठी वेळ दिला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. 

महापालिकेच्या एप्रिल 2020 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना प्रभागरचना तयार करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या निवडणूक विभागाने प्रभागरचनेचा आराखडा तयार करून तो जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सादर केला होता. विभागीय आयुक्तांनी तो आयोगाकडे सादर केला. दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्याने प्रभागरचना रद्द होऊन पुन्हा वॉर्डपद्धतीने निवडणुका होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता; पण गुरुवारी (ता.12) प्रभागरचनेला निवडणूक आयोगाने मान्यता दिल्याचे सांगण्यात आले.

क्लिक करा - कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी 

प्रभागरचना अद्याप जाहीर झालेली नाही; मात्र त्याआधी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्‍चित केले जाणार आहे. त्यासाठी सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 18 डिसेंबरला सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात आरक्षण सोडत होणार आहे. 

20 डिसेंबरपासून हरकती 
प्रभागरचनेची अधिसूचना शुक्रवारी (ता.20) शासन राजपत्रात प्रसिद्ध होईल. त्यानंतर लगेचच त्यावर सूचना आणि हरकती घेण्यास सुरवात होईल. 30 डिसेंबरपर्यंत या सूचना आणि हरकती स्वीकारण्यात येतील. चार जानेवारीला सूचना आणि हरकतीचे विवरणपत्र निवडणूक आयोगास सादर केले जाईल, असे महापालिका आयुक्तांनी नमूद केले आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात प्रभागांचे चित्र अंतिम होणार आहे. 

मृत्यूदंड - कसा तयार होतो फाशीचा दोर? काय म्हणतात त्याला...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Election News