बीड : जिल्ह्यात आता नगरपालिकांचा धुराळा

लवकरच निवडणुकीचे बिगुल वाजणार; मातब्बरांसाठी विधानसभेची चाचपणी
 Municipal Election
Municipal Electionsakal

बीड : पाच नगर पंचायतींचा निकाल लागला असून, आता पुढच्या महिन्यात नगराध्यक्षांची निवडही होणार आहे. निकालानंतर जय- पराजयावरुन नेत्यांमध्ये राजकीय द्वंद लागले. कोण जिंकले, का जिंकले आणि कोण हरले याचा धुराळा आता संपला आहे. मात्र, लवकरच सहा नगर पालिकांच्या होणाऱ्या निवडणुका जिल्ह्यातील मातब्बरांसाठी विधानसभेची धुळपेरणी ठरणार आहे. यात कोण बाजी मारणार हे महत्त्वाचे आहे.जिल्ह्यातील वडवणी, केज, शिरूर कासार, पाटोदा व आष्टी या पाच नगर पंचायतींच्या निकालात भाजपने बाजी मारली.

 Municipal Election
कधीतरी तयार झालेला रस्ता दाखवा MIDC रस्त्यांवरुन मनसेकडून शिवसेना ट्रोल

तशा या पाच पैकी आष्टी, पाटोदा व शिरूर कासार नगर पंचायती भाजपपेक्षा आमदार सुरेश धसांचा बालेकिल्ला आहेत. कारण, पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत सुरेश धस राष्ट्रवादीत असताना व राज्यात भाजपची सत्ता आणि पंकजा मुंडे पालकमंत्री असताना या नगर पंचायती राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. धसांच्या भाजप प्रवेशानंतर या नगर पंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला होता. आता या निकालात पुन्हा धसांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजयी फटका मारला आहे. मागच्या सत्तेवेळी भाजपच्या ताब्यात असलेली वडवणीची नगर पंचायतीत मात्र भाजपची काहीशी पिछेहाट झाली आहे. तर, केजमध्येही आघाडीने बाजी मारली आहे. तसा थेट संबंध नसतानाही निकालानंतर मुंडे विरुद्ध- मुंडे वाद पेटला आणि जय पराजय त्यांच्या खात्यात टाकला गेला. जिल्ह्यात अधिक यश भाजपने मिळविल्याने पंकजा मुंडेंच्या खात्यात विजयाचे श्रेय गेले. पण, आता काहीच दिवसांनी नगर पालिकांचा धुराळा उडणार आहे. त्यांचे होमपिच परळीतही निवडणूक होणार आहे.

 Municipal Election
अणसुरेची जैवविविधता’ आता एका क्लीकवर

बीडमध्ये दोन्ही क्षीरसागरांना मेटे टक्कर देणार का?

बीड नगर पालिकेची निवडणूक माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासाठी ‘करो या...’ची आहे. यात आता शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनीही उडी घेत तयारी चालविली आहे. स्थानिक नेतृत्व डॉ. भारतभूषण क्षीरसागर करत असले तरी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने जयदत्त क्षीरसागरांसाठी ही महत्त्वाची निवडणूक आहे. अनुभव, यंत्रणा व इतर शक्तिस्थाने असले तरी त्यांच्यासाठी पक्षाच्या चिन्हाचाच मोठा पेच असल्याचे सांगितले जाते. तर, निवडणुकीच्या तोंडावर संदीप क्षीरसागर यांच्याकडून विविध विकास कामांच्या भूमिपूजनाच्या माध्यमातून त्यांनी जणू निवडणूक प्रचाराचा नारळच फोडला आहे. मागच्या वेळी पक्षाचे लेबल नसताना त्यांची चांगली कामगिरी केली होती. आता तर त्यांच्या हाती हक्काची घड्याळ आहे. तर, शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्याकडूनही दोन्ही क्षीरसागरांवर आरोपांचे बॉम्ब फोडून बीडकरांना साद घातली जात आहे. मागच्या वेळी मेटे तसे सत्तेत होते. तरीही निवडणुकीत त्यांच्या पक्षाची चांगलीच दमछाक झाली होती. आताच्या निवडणुकीत ते उतरणार कोणत्या तयारीने हेच महत्त्वाचे आहे.

 Municipal Election
पैसे कोणी मागितले! ग्लोबल टिचर डिसलेंना द्यावे लागणार उत्तर, अन्यथा...

परळीच्या होमपिचवर पंकजा मुंडेंची कसरत

नगर पंचायतींच्या निकालानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याकडून पालकमंत्री धनंजय मुंडेंना चेकमेट असा धुराळा भाजप समर्थकांनी उडविला. पण, आता होणाऱ्या निवडणुकांत परळी नगर पालिकेचीही निवडणूक आहे. मागच्या वेळी भाजपची सत्ता, याच ठिकाणच्या पंकजा मुंडे आमदार आणि पालकमंत्री असताना धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने भाजपचा दारुण पराभव केला होता. त्यापूर्वीच्या निवडणुकीतही राजकीय डावपेचात धनंजय मुंडेच माहिर ठरले होते. तीच निवडणूक त्यांच्या राजकीय वाटचालीतील मैलाचा दगड ठरलेली आहे. आता येथील सत्ताबदलात पंकजा मुंडे यशस्वी ठरणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. सत्तेच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी शहरात विविध विकास कामे केली आहेत.

 Municipal Election
कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी 'टनेल मॅन'? वाचा प्रेरणादायी संघर्ष

गेवराईचा पवारांचा गड पंडित कसा सर करणार?

गेवराई नगर पालिका हा भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांचा गड मानला जातो. स्वत: नगराध्यक्ष राहिलेल्या पवारांना विधानसभेतही गेवराईची साथ भक्कम असते. गावचे रहिवासी आणि शहराची माहीत असलेली नाळ ही त्यांची जमेची बाजू आहे. आता राष्ट्रवादी सत्तेत आहे, आणि शहरातील गायरान अतिक्रमण, नगर पालिकेतील अनियमितता हे महत्त्वाचे मुद्दे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी चव्हाट्यावर आणले आहेत. त्यांचा निवडणुकीत किती फरत पडतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे. गेवराईत घुसता येणे भविष्यात विधानसभेला पंडितांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. पण, आता गेवराईचे गडकरी पवारच राहणार की पंडित हा गड सर करणार हे पहावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com