महापालिका अधिकाऱ्यांना ‘केआरए’

महापालिका अधिकाऱ्यांना ‘केआरए’

औरंगाबाद - महापालिकेतील अधिकाऱ्यांना ड्रेस कोड लागू केल्यानंतर आयुक्त डॉ. निपुण विनायक आता ‘केआरए’ (की रिझल्ट एरिया) लागू केला आहे. वर्षभराच्या कामाचे उद्दिष्ट निश्‍चित करून त्यानुसार अहवाल सादर करण्याच्या सूचना विभागप्रमुखांना करण्यात आल्याचे आयुक्तांनी मंगळवारी (ता. २१) सांगितले.

महापालिकेत अधिकारी-कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे. त्यात अनेक जण निवृत्त होत असून, घटत चाललेल्या अधिकाऱ्यांच्या संख्येमुळे कामकाजावर परिणाम होत आहे. अनेक महत्त्वाची कामे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्यामुळे यंदा विभागप्रमुखांसाठी केआरए लागू करण्यात आला आहे. त्यासाठी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी नुकतीच अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यासंदर्भात माहिती देताना ते म्हणाले, ‘‘बैठकीत सर्व विभागांतील प्रमुख कामांची यादी तयार करण्यात आली. प्रत्येक विभागातील प्राधान्यक्रमाने पूर्ण करावयाच्या आठ ते दहा कामांचा समावेश करून ती कामे पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची सूचना केली आहे. तसेच विभागप्रमुखांना पत्र देऊन कामाचे नियोजन करण्यासंदर्भात सूचित केले आहे.’’

प्रत्येक शनिवारी अहवाल 
आयुक्तांनी विभागप्रमुखांना लिहिलेल्या पत्रात म्हटले, आपल्या विभागाचे काम करीत असताना ठराविक निकष समोर ठेवल्यास फायदा होतो. आपल्या विभागाशी संबंधित निकष काय असावे, याबाबत वेळोवेळी चर्चा केली आहे. पुढील वर्षी कामे करीत असताना केआरए मार्गदर्शक बिंदू समजून काम करावे आणि हे साध्य करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करावेत. केआरए आपल्या कार्यमूल्यांकनासाठीसुद्धा उपयोगी ठरतील. दर शनिवारी प्रगती अहवाल द्यावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com